शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया

By admin | Updated: April 16, 2017 04:40 IST

कळंबोली सर्कलगत असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिनीला गळती लागल्याने लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. द्रुतगती मार्गाच्या पुलाखाली

कळंबोली : कळंबोली सर्कलगत असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिनीला गळती लागल्याने लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. द्रुतगती मार्गाच्या पुलाखाली पाण्याचे डोह साचले आहे. एकीकडे पाणीटंचाई जाणवत असताना दुसरीकडे अशाप्रकारे लाखो लिटर पाणी वाया जात असल्याबद्दल नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. वारंवार दुरुस्ती करूनही गळती होत असल्याने एमजेपीही हतबल झाल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून भोकरपाडा ते जेएनपीटी आणि कळंबोली या दरम्यान ३५ वर्षांपूर्वी जलवाहिनी टाकण्यात आली होती. आजघडीला ती अतिशय जुनाट आणि जर्जर झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी गळती लागून कारंजे उडताना दिसतात. जवळपास २५ टक्के पाण्याची गळती होत आहे. कळंबोली स्टील मार्केट परिसरात तर वाहनचालक, झोपडपट्टीवासी जाणूनबुजून जलवाहिन्या फोडत असल्याच्या तक्र ारी येत आहेत. द्रुतगती महामार्गालगत असलेल्या एमजेपीच्या जलवाहिनीला गेल्या अनेक वर्षांपासून फुटीचे ग्रहण लागले आहे. येथून मोठ्या प्रमाणात पाणी पुलाखालील खड्ड्यात पडते. त्या ठिकाणी गेल्यानंतर कडक उन्हाळ्यातही पावसाळा आहे की, असा भास होतो. सध्या पनवेल शहरात दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. दुसरीकडे सिडको वसाहतीत मागणीप्रमाणे पाणी मिळत नाही, ही वस्तुस्थिती असताना कळंबोली पुलाखाली लाखो लिटर पाणी साचलेले आहे. त्याचा वापर कशासाठीही करता येत नसल्याची खंत शंकर वीरकर या रहिवाशांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे, जलशुद्धीकरण केंद्रात स्वच्छ केलेल्या पिण्याच्या पाण्याचा अशा प्रकारे अपव्यय होऊ देणे अतिशय चुकीची बाब असल्याचे मत खांदा वसाहतीतील सविता मिसाळ यांनी व्यक्त केले.