शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

स्टील मार्केटवरील भार घटणार

By admin | Updated: July 13, 2015 02:59 IST

आशिया खंडातील सर्वात मोठा समजल्या जाणाऱ्या कळंबोलीत लोखंड-पोलाद बाजाराचे विकेंद्रीकरण करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. याकरिता लोह-पोलाद बाजार

कळंबोली : आशिया खंडातील सर्वात मोठा समजल्या जाणाऱ्या कळंबोलीत लोखंड-पोलाद बाजाराचे विकेंद्रीकरण करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. याकरिता लोह-पोलाद बाजार समितीनेसुध्दा सकारात्मक भूमिका घेतली आहे. वाहतुकीत जाणारा वेळ त्याचबरोबर व्यापारी व ग्राहकांची सोय व्हावी याकरिता दोन ते तीन ठिकाणी यार्ड तयार करण्याचा प्रस्ताव आहे. ही संकल्पना प्रत्यक्षात उतरली तर कळंबोलीवरील भार कमी होईल, असा विश्वास समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.मुंबई शहराला पर्याय म्हणून नवी मुंबई शहर विकसित करण्याबरोबरच शासनाने त्या ठिकाणचा लोखंड- पोलाद बाजार कळंबोली येथे हलवला. येथील ३०२ हेक्टर जमिनीवर १२५, २५०, ४५०, ९०० चौ.मी. अशा वेगवेगळ्या आकाराचे १९६० भूखंड पाडण्यात आले. १९८० मध्ये सिडकोने भाडे करार करून लीज तत्त्वावर हे भूखंड व्यापाऱ्यांना दिले. अतिशय विस्तीर्ण असलेल्या या बाजारात टाटा स्टील कंपनी, स्टील अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया, राष्ट्रीय पार्कनिगम या मोठ्या वखारी आहेत. त्याचबरोबर लोह -पोलादाची मोठमोठी गोदामे असून या ठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणात लोह-पोलाद येते आणि जाते. महाराष्ट्रच नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यातून ट्रक आणि कंटेनर स्टील मार्केटमध्ये लोखंडाची ने-आण करण्याकरिता फेऱ्या मारतात. हजारो वाहनांची सतत वर्दळ सुरू असते. देशभरात त्याचबरोबर बाहेरच्या देशातही याच बाजारपेठेतून लोह-पोलादाचा व्यापार होतो. जेएनपीटी बंदरातूनही कळंबोलीतील लोखंड व्यापारी आयात-निर्यात करतात. उत्तर आणि दक्षिणेकडील राज्यातून ये -जा करणाऱ्या वाहनांना मालाची चढ -उतार करण्याकरिता आजच्या घडीला कळंबोली गाठावी लागते. त्यामुळे महामार्गावर अवजड वाहनांची गर्दी होते. विशेषत: मुंब्रा, मुंबई-गोवा व जेएनपीटी मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहने ये-जा करतात. यामुळे वाहतूक कोंडी, अपघात घडतात. या व्यतिरिक्त कळंबोली बाजारातही अवजड वाहनांची गर्दी असल्याने लोडिंग- अनलोडिंगला विलंब लागतो. या सर्व गोष्टींचा विचार करून बाजार समितीने कळंबोली स्टील मार्केटचे विकेंद्रीकरण करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव अद्याप प्राथमिक टप्प्यात असला तरी त्यादृष्टीने बाजार समिती सकारात्मक असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी उत्तम इंदलकर यांनी दिली. याबाबत बैठकीत सखोल चर्चा झाली असून समितीच्या संचालकांनी काही सूचनाही केल्याचे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)