शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्तांची प्रत्येक कामावर करडी नजर

By admin | Updated: May 10, 2017 00:24 IST

महापालिका आयुक्त रामास्वामी एन. यांनी एनएमएमटी, मलनि:सारण केंद्रासह सर्व प्रकल्पांना अचानक भेट देवून माहिती घेण्यास सुरवात केली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : महापालिका आयुक्त रामास्वामी एन. यांनी एनएमएमटी, मलनि:सारण केंद्रासह सर्व प्रकल्पांना अचानक भेट देवून माहिती घेण्यास सुरवात केली आहे. रस्ते व इतर विकासकामांना मंजुरी देण्यापूर्वी घटनास्थळी जावून प्रत्यक्ष पाहणी करण्यास सुरवात केली असून शहरातील विकासकामांवर स्वत:ची करडी नजर राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. नागरिकांनी कररूपाने दिलेल्या पैशाचा काटेकोरपणे त्यांच्याच हितासाठी वापर झाला पाहिजे यासाठी विकासकामांचे नियोजन करताना आयुक्तांनी विशेष लक्ष देण्यास सुरवात केली आहे. आवश्यक तीच कामे करण्यावर भर देणार असल्याचे कृतीतून स्पष्ट केले आहे. बेलापूर सेक्टर १९, २० व ३० मधील रस्त्यांची कामे करणे प्रस्तावित आहे. या कामांना मंजुरी देण्यापूर्वी आयुक्तांनी अचानक घटनास्थळी भेट देवून दोन्ही रस्त्यांची पाहणी केली. भविष्यातही प्रत्येक फाईल बनविताना अधिकाऱ्यांनी त्या कामांच्या ठिकाणी जावून प्रत्यक्ष पाहणी करूनच नियोजन करण्यावर भर देण्यात येणार आहे. आयुक्तांनी सेक्टर५०मधील मलनि:सारण केंद्रांना भेट देवून तेथील कामकाजाची पाहणी केली. केंद्राचे काम व्यवस्थित सुुरू आहे का याची पाहणी केली. एनएमएमटीच्या सीबीडी बेलापूरमधील नवीन प्रशासकीय भवनला भेट दिली. उपक्रमाचा तोटा भरून काढण्यासाठी आवश्यक त्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. तोट्यातील बसमार्ग बंद करणे, नवीन मार्ग सुरू करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. परिवहन उपक्रमाचा तोटा भरून काढण्यासाठी पालिका व एनएमएमटीने संयुक्त जाहिरातधोरण तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. उपक्रमाची आयटीएस प्रणाली व इतर कामांचा आढावा यावेळी घेण्यात आला. उपक्रमातील सर्वात चांगली कामगिरी करणारे पहिले दहा चालक, वाहक व कर्तव्यात कसूर करणारे दहा चालक, वाहक यांचा अहवाल तयार करून त्यावर उचित कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.