कर्जत : नेरळमध्ये देवदर्शनासाठी शिर्डी येथे गेलेल्या देवरु खकर यांच्या बंद असलेल्या घरातील तब्बल 5क् तोळे सोन्याचे दागिने चोरटय़ांनी लंपास केले आहेत. गेल्या दोन दिवसातील ही चौथी घटना असून त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
नेरळ - कशेळे रस्त्यावर साईमंदिर परिसरात संदीप हनुमंत देवरुखकर यांचा बंगला आहे. ते कुटुंबासह शिर्डी येथे देवदर्शन करण्यासाठी गेले होते. घरात कोणी नसल्याचा फायदा घेवून चोरटय़ांनी लोखंडी दरवाजा फोडून बंगल्यातील किमती वस्तूंवर दरोडा टाकला. 27 ऑक्टोबर रोजी सकाळी त्या रस्त्याने जात असताना देवरु खकर यांचे मित्न शशिकांत मोहिते यांना बंगल्याचे गेट बंद आहे, परंतु दरवाजा उघडलेला पाहिल्यावर देवरुखकर यांना कळविले. देवरूखकर यांनी शिर्डी येथून थेट नेरळ गाठले. तेव्हा घरातील लोखंडी आणि लाकडी कपाट फोडून त्यातील सोन्याचे दागिने गायब झाल्याचे त्यांच्या निदर्शनात आले. त्यांनी 28 ऑक्टोबर रोजी नेरळ पोलिस ठाणो गाठले, तेथे घडलेल्या घटनेची तक्र ार नोंदविली.
संदीप देवरु खकर यांच्या घरातून चोरटय़ांनी सत्तर हजारांची रोकड लंपास केली, त्याचवेळी तब्बल 50 तोळे सोने लंपास केले आहे. त्यात सोनसाखळय़ा, सोन्याच्या अंगठय़ा, सोन्याच्या बांगडय़ा, पेंडंट, मंगळसूत्न, तोडे, नथ, मोत्याचा हार आदी किमती ऐवज लांबविला आहे. चोरटय़ांनी घडय़ाळ आणि काही चांदीचे दागिने लंपास केले असून पोलिसांनी या दागिन्यांची रक्कम खरेदीच्या भावानुसार सव्वा सात लाख इतकी लावली आहे. (वार्ताहर)
पोलिसांना अपयश
गेल्या काही दिवसांपूर्वी नेरळ बाजारपेठेतील एका सोने व्यापा:याला चोरटय़ांनी लुबाडले होते, त्यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षकांनी नेरळला येवून घटनास्थळाची पाहणी करून सूचना केल्या होत्या. मात्न आजर्पयत त्या घटनेचा तपास नेरळ पोलीस लावू शकले नाहीत. या घटनेचा सहायक पोलीस निरीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार अधिक तपास करीत आहे.