नवी मुंबई : स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी त्याचबरोबर कॉर्पोरेट क्षेत्रातील नोकरीच्या असंख्य संधींमुळे विद्यार्थ्यांचा कल एमबीएसारख्या क्षेत्राकडे वाढत असताना पाहायला मिळतो आहे. एमबीए करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा, परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची काठीण्य पातळी, वेळेचे नियोजन तसेच या स्पर्धा परीक्षेत हमखास यश मिळविण्यासंदर्भात विद्यार्थ्यांना अमूल्य मार्गदर्शन केले जाणार आहे. ‘लोकमत’ व कोहिनूर बिझनेस स्कूल (केबीएस) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘व्हिजन एमबीए २०१७’ या कार्यशाळेचे वाशी येथे आयोजन करण्यात आले आहे. वाशीतील दैवज्ञ भवन, सेक्टर ९/ए या ठिकाणी २५ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० ते दुपारी ३ या वेळेत या मार्गदर्शन कार्यशाळा सुरू होणार आहे.ज्या विद्यार्थ्यांना या शैक्षणिक वर्षात एमबीए करावयाचे अशा विद्यार्थ्यांकरिता या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. परीक्षेतील गुणसंख्या कशी वाढवावी, टक्केवारीत भर घालण्याकरिता काय करता येईल, व्हर्बल, लॉजिकल रिझनिंग, स्पर्धा परीक्षांची पूर्वतयारी, त्याचबरोबर बी स्कूलची निवड या अशा विविध घटकांवर या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन या ठिकाणी लाभणार आहे. कार्यशाळेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी ९८२०१५५४०५ या क्रमांकावर संपर्क साधावा,
लोकमत ‘व्हिजन एमबीए २०१७’
By admin | Updated: February 22, 2017 06:55 IST