शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

खारघरमध्ये ‘लोकमत’चे जलमित्र अभियान

By admin | Updated: May 26, 2016 02:57 IST

गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी पाऊस पडल्याने धरणात जलसाठा मर्यादित राहिला आहे, त्यामुळे टंचाईग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक सामाजिक संस्था व

कळंबोली : गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी पाऊस पडल्याने धरणात जलसाठा मर्यादित राहिला आहे, त्यामुळे टंचाईग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक सामाजिक संस्था व शासनाकडून पाणीबचतीचा संदेश देण्यात येत आहेत. त्याचबरोबर ‘लोकमत’ने सुध्दा जलमित्र अभियान हाती घेतले असून या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. बुधवारी खारघर येथील नामांकित थ्री स्टार हॉटेलमध्ये हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी ग्राहकांचे पाणी बचतीविषयी प्रबोधन केले.लोकमत वृत्त समूह सातत्याने सामाजिक विषय हाती घेवून लोकांमध्ये जनजागृती करत आहे. गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात पाणीटंचाई त्याचबरोबर दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. असे असतानाही शहरात बहुतांशी ठिकाणी पाण्याचा अपव्यय केला जात आहे. गरजेपेक्षा जास्त पाण्याचा वापर करून नासाडी केली जात आहे. विशेष करून हॉटेलमध्ये पाण्याचा अपव्यय करण्यात येत आहे. अर्धा ग्लास पाणी हवे असेल तर त्याकरिता संपूर्ण ग्लास पाणी घेवून त्याचा अपव्यय केला जात असल्याचे स्पष्ट झाल्याने ‘लोकमत’ने विशेष करून हॉटेलमध्ये जलमित्र अभियान हाती घेतले आहे. त्यानुसार बुधवारी सायन-पनवेल महामार्गालगत हिरानंदानी संकुलात असलेल्या थ्री स्टार या हॉटेलमध्ये हे अभियान राबविण्यात आले. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त प्रकाश निलेवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पाटील, थ्री स्टारचे व्यवस्थापक रितेश सिन्हा, मयूर हरळकर, विश्वनाथ शेट्टी, जुबेर खान उपस्थित होते.सुरुवातीला हॉटेलमध्ये सेवा पुरविणाऱ्या वेटरना बोलावून पाण्याचा अपव्यय टाळण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्याचरोबर ग्राहकांबरोबर सुध्दा संवाद साधून पाणीबचतीचा संदेश देण्यात आला. मी मूळचा नांदेड म्हणजे मराठवाड्यातील असून पाण्याचे महत्त्व काय आहे याची जाणीव मला आहे. कारण या ठिकाणी सातत्याने दुष्काळ पडतो. शालेय जीवनात आम्ही पहाटे उठून दूर जावून बैलगाडीतून पाणी आणत होतो आणि तेच पुरवून पुरवून वापर करत असल्याचे प्रकाश निलेवाड यांनी सांगितले. पाण्याअभावी पैनगंगा धबधबा बंद पडल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. पाणीबचतीबाबत ‘लोकमत’ने जे जलमित्र अभियान हाती घेतले त्याबद्दल निलेवाड यांनी कौतुक करीत शुभेच्छा दिल्या. थ्री स्टारचे व्यवस्थापक रितेश सिन्हा यांनी पाणीबचतीबाबत ‘लोकमत’ने घातलेली साद अतिशय योग्य असल्याचे सांगितले. त्यानुसार आम्ही आगामी काळात पाण्याचा अपव्यय करणार नाही अशी ग्वाही देवून वेटर आणि ग्राहकांमध्ये जागृती करणार असल्याचेही सांगितले. (वार्ताहर) पत्रकाद्वारे प्रबोधनथ्री स्टार हॉटेलमध्ये ग्राहक आणि वेटर यांना जलमित्र अभियानांतर्गत मार्गदर्शन करण्यात आले. त्याचबरोबर हॉटेलमध्ये भिंतीवर माहिती पत्रक लावण्यात आले. त्याचबरोबर वॉश बेसिन आणि टेबलवर जलबचतीची माहिती देणारे माहिती पत्रक ठेवण्यात आले. हे पत्रक सगळ्यांचे लक्ष आकर्षित करून घेत होते. टेबलवर पिवून उरलेले ग्लासातील पाणी एका भांड्यामध्ये संचय करण्यात आले.