शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंच्या भेटीबाबत अनिल परबांनी सगळे सांगितले; म्हणाले, “युती, जागावाटप अन्...”
2
"एक मुस्लीम महिला म्हणून…!"; हिजाब ओढल्यावरून 'दंगल गर्ल' जायरा नीतीश कुमारांवर भडकली!
3
पश्चिम बंगालमध्ये ५८ लाख मतदारांची नावे वगळली, निवडणूक आयोगाने नवी यादी केली प्रसिद्ध
4
IPL 2026 Auction: अखेरच्या क्षणी BCCI कडून यादीत बदल! टीम इंडियातून डावललेला खेळाडूही लिलावात दिसणार
5
धक्कादायक...! हल्लेखोर पिता-पूत्र भारताच्या पासपोर्टवर मनिलाला आलेले; फिलिपिन्सच्या दाव्याने खळबळ 
6
‘मनरेगा’चं नाव बदलण्याविरोधात प्रियंका गांधी आक्रमक, लोकसभेत सरकारला सुनावले खडेबोल
7
PAN-Aadhaar लिंक करण्याची अखेरची तारीख जवळ; विसरलात तर लागेल इतका दंड, पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसिजर
8
ज्या ठिकाणी गायब होतात विमाने अन् जहाज...'त्या' बर्म्युडा ट्रॅंगलवर वैज्ञानिकांचा नवा खुलासा
9
जनरल याह्या खान, नियाझी 'मदिरा, महिलां'त अडकलेले...; बांगलादेश मुक्तीसंग्रामाचा रिपोर्ट पाकिस्तानने दडपलेला...
10
संजय राऊतांनी घेतली राज ठाकरेंची भेट; म्हणाले, “काँग्रेस आमच्यासोबत नाही, भाजपाला मदत...”
11
Video - मनालीला गेलेल्या पर्यटकासोबत 'स्नो स्कॅम'; युजर म्हणतात, "यापेक्षा जास्त बर्फ फ्रीजमध्ये"
12
फोल्डेबल आयफोनमध्ये काय काय मिळणार? अ‍ॅप्पलनं निश्चित केले फीचर्स, किंमत जाणून थक्क व्हाल!
13
Video - "मी GPS लावला होता..."; हॉटेलमध्ये बायकोला रंगेहाथ पकडल्यावर ढसाढसा रडला नवरा
14
जागावाटपावरून महायुतीत तणाव! मुंबईत शिंदेसेनेला हव्यात १०० हून अधिक जागा, भाजपाचा प्लॅन बी तयार
15
वसंत मोरे मनसे कार्यालयात जाणार; ठाकरे बंधू युतीमुळे पुण्यात पदाधिकाऱ्यांमधील रुसवे फुगवे दूर
16
IPL ऑक्शनच्या दिवशीच परफेक्ट ऑडिशन! व्यंकटेश अय्यरचा SMAT स्पर्धेतील टी-२० सामन्यात मोठा धमाका
17
पश्चिम बंगालमध्ये लाखो मतदारांची नावं वगळली, SIRच्या मसुदा यादीतून धक्कादायक आकडेवारी समोर 
18
National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना मोठा दिलासा
19
ICICI Prudential IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आज अखेरची संधी; GMP ₹३०० च्या पार, धमाकेदार लिस्टिंगचे संकेत
20
पीएम नरेंद्र मोदी जॉर्डनच्या दौऱ्यावर; भारतासाठी का महत्वाचा आहे हा देश? जाणून घ्या...
Daily Top 2Weekly Top 5

उच्च न्यायालयाच्या निर्णयाने लॉजिस्टिक पार्क अडचणीत; भूखंड योजना ऐच्छिक असल्याचा निर्वाळा

By कमलाकर कांबळे | Updated: October 28, 2025 09:55 IST

सिडकोचा लॉजिस्टिक पार्कच्या भूसंपादनाचा तिढा वाढणार आहे.

कमलाकर कांबळेनवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्श्वभूमीवर सिडकोने प्रस्तावित केलेल्या लॉजिस्टिक पार्कचा प्रकल्प अडचणीत सापडला आहे.  साडेबावीस टक्के भूखंड योजना ऐच्छिक नसून, एक पर्याय असल्याचा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे. त्याऐवजी २०१३ मधील केंद्र शासनाच्या भूसंपादन कायद्यानुसार मोबदला द्यावा, असेही स्पष्ट केले आहे. त्यामुळे सिडकोचा लॉजिस्टिक पार्कच्या भूसंपादनाचा तिढा वाढणार आहे.

जेएनपीए आणि आंतरराष्ट्रीय नवी मुंबई विमानतळाच्या मध्ये असलेल्या ६४० हेक्टर जागेवर सिडकोने लॉजिस्टिक पार्क प्रस्तावित केले आहे. त्यापैकी सिडकोच्या ताब्यात काही जमीन  आहे. उर्वरित नऊ पॉकेटमधील ३८९ हेक्टर जमीन संपादित करण्यासाठी सिडकोची धडपड सुरू आहे. भूसंपादन कायद्यानुसार नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकरी करत आहेत. विशेष म्हणजे मुंबई उच्च न्यायालयानेच शेतकऱ्यांच्या बाजूने कौल दिल्याने  ‘लॉजिस्टिक’ संकटात सापडला आहे. 

न्यायालयाच्या निर्णयाचा सिडकोला फटका

या प्रकल्पासाठी बैलोंडाखार हद्दीतील दादरपाडा, धुतूम, चिर्ले गावठाण, जांभूळपाडा, वेश्वी, दिघोडे या गावांतील जमिनी संपादित केल्या जाणार आहेत. 

याप्रकरणी उरण तालुक्यातील बैलोंडाखार गावातील वसंत माया मोहिते आणि इतरांनी राज्य शासन आणि सिडकोच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर गेल्या महिन्यात सुनावणी झाली. 

न्यायमूर्ती जी. एस. कुलकर्णी आणि न्या. आरती साठे यांनी निकाल दिला. त्यामुळे या सात गावांतील भूधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, न्यायालयाच्या या निर्णयाचा फटका सिडकोच्या विविध प्रस्तावित प्रकल्पांच्या भूसंपादन प्रक्रियेला बसू शकतो.

स्थानिक शेतकऱ्यांचा प्रस्तावाला विरोध 

लॉजिस्टिक पार्कसाठी संपादित केल्या जाणाऱ्या जमिनीचा मोबदला म्हणून संबंधित भूधारकांना साडेबावीस टक्के याेजनेंतर्गत भूखंड देण्याची सिडकोची योजना आहे. त्यासाठी सिडकोने येथील शेतकऱ्यांकडून संमतीपत्रे मागवली आहेत. 

प्रस्तावाला शेतकऱ्यांचा  विरोध आहे. कारण १९८८ मध्ये सिडकोने या जमिनी वगळल्या होत्या. त्यानंतर पुन्हा १९७२ च्या अधिसूचनेचा आधार घेऊन त्या संपादित केल्या जाणार आहेत. 

शेतकऱ्यांचा नेमका याच मुद्द्याला विरोध असून, केंद्र शासनाच्या २०१३ मधील कायद्यानुसार भूसंपादन करावे. तसेच या कायद्यातील तरतुदीनुसार बाजारभावाच्या चारपट दर, पुनर्वसन म्हणून रोजगार, २० टक्के विकसित भूखंड आदी लाभ मिळावेत, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : High Court ruling jeopardizes logistics park; land scheme deemed optional.

Web Summary : The High Court's decision has stalled CIDCO's logistics park project near Navi Mumbai Airport. The court ruled the 22.5% land scheme is optional, mandating compensation as per the 2013 land acquisition act. Farmers demand higher compensation, further complicating land acquisition for the 640-hectare park.
टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईcidcoसिडको लॉटरी