शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

विजेचा लपंडाव चोरट्यांच्या पथ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 03:14 IST

शहरात विजेचा लपंडाव सुरू असतानाच चोरट्यांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनाच झटका दिल्याचा प्रकार वाशीत घडला आहे.

नवी मुंबई : शहरात विजेचा लपंडाव सुरू असतानाच चोरट्यांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनाच झटका दिल्याचा प्रकार वाशीत घडला आहे. सेक्टर १५ मधील महावितरण कर्मचाºयांच्या वसाहतीमधील सहा घरांचे कुलूप तोडून घरफोडी झाली आहे.गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास कळवा येथील महावितरणच्या सबस्टेशनला आग लागल्याने शहरातल्या अनेक विभागाचा वीजपुरवठा खंडित झाला होता. त्याशिवाय मागील काही दिवसांपासून शहरात विजेचा लपंडाव सुरूच आहे. त्यामुळे ऐन गरमीच्या दिवसात वीज गुल होत असल्याच्या त्रासामुळे रहिवाशांमध्ये महावितरणच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त होत आहे. अशातच शहरात सुरू असलेला विजेचा लपंडाव चोरट्यांच्या पथ्यावर पडू लागल्याचा प्रकार वाशीत घडला आहे.सेक्टर १५ येथील महावितरणच्या कर्मचाºयांच्या सोसायटीमधील सहा घरे एकाच रात्रीत फोडण्यात आली आहेत. संबंधित घरातील व्यक्ती सुट्टीनिमित्ताने गावी गेल्याने घरे बंद असताना त्याठिकाणी घरफोडी झाली आहे. शुक्रवारी सकाळी सदर घरांचे टाळे तुटलेले असल्याचे शेजारच्यांच्या निदर्शनास आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. मध्यरात्रीच्या सुमारास विजेचा लपंडाव सुरू असताना या घरफोड्या झाल्या असाव्यात असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.सदर सोसायटीला सुरक्षारक्षक असताना देखील हा प्रकार घडला आहे. घटना उघडकीस आल्यानंतर वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अजयकुमार लांडगे यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली.