शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘अ‍ॅटलान्टिस’विरोधात दुय्यम निबंधकांनाही पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 06:52 IST

घरांसह दुकानांच्या पुनर्विक्रीसही मज्जाव : उच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल करणार

- नारायण जाधव

ठाणे : चटईक्षेत्र चोरून कोट्यवधींची लूट करणाऱ्या घणसोलीतील अ‍ॅटलान्टिस टॉवरच्या विकासकाच्या अडचणीत आणखी वाढल्या आहेत.

नवी मुंबई महापालिकेने त्यामधील घरे आणि दुकाने खरेदी करूनयेत, असे आवाहन केल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यानंतर आता त्या विरोधात मुद्रांक व नोंदणी विभागाच्या दुय्यम निंबधकांनाही त्यातील सदनिका आणि घरांच्या खरेदी-विक्री वा पुनर्विक्रीची नोंदणी करू नये, असे पत्र दिले आहे. शिवाय पालिकेच्या निर्णयाविरोधात विकासकाने न्यायालयात धाव घेऊन स्थगिती आणू नये, म्हणून उच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल करण्यासाठीही संबधित विभागास पत्र दिले आहे.

राज्यात नव्याने अनधिकृत बांधकामे होऊ नयेत, त्यात घरे घेऊन सर्वसामान्यांची फसवणूक होऊ नये, म्हणून अशा बांधकामांच्या याद्या संबंधित नियोजन प्राधिकरणांनी दुय्यम निबंधकांकडे द्याव्यात, तसेच त्या आपल्या संकेतस्थळांवर आणि वृत्तपत्रांत प्रसिद्ध करण्याचे आदेश नगरविकास विभागाने ३ मे २०१८ रोजी दिले होते. त्यानुसारच, अ‍ॅटलान्टिसविरोधात ऐरोली येथील दुय्यम निबधकांच्या कार्यालयात तक्रार केली असल्याचे, नवी मुंबई महापालिकेचे घणसोली विभागाचे सहायक आयुक्त दत्तात्रेय नागरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. याच आदेशान्वये आयुक्त रामास्वामी एन. यांच्या निर्देशांनुसार उपायुक्त अमरीश पत्नीगिरे यांनी न्यायालयात कॅव्हेट दाखल करण्याबाबत संबंधित विभागाला पत्र दिले असल्याचे नागरे यांनी स्पष्ट केले.नगररचना अधिकारी हादरलेविकासकाच्या अनधिकृत बांधकामास हरकत न घेता उलट, बिनदिक्कत ओसी देऊन त्यात घरे, दुकाने घेणाºयांची फसवणूक करण्यास हातभार लावल्याने त्यांच्यावर कारवाई व्हावी, याबाबत लोकमतमध्ये वृत्त प्रसिद्ध होताच नगररचना खात्याचे अधिकारी पुरते हादरले आहेत. कारण आयुक्त रामास्वामी एन. हे कठोर अधिकारी असल्याने त्यांच्यावर कारवाई निश्चित मानली जात आहे.