शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणाधिका-यांना नेतृत्व विकासाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 01:44 IST

शिक्षण अधिका-यांमध्ये शैक्षणिक नेतृत्व गुण विकसित व्हावा, याकरिता प्रादेशिक विद्या प्राधिकरणाच्या वतीने कळंबोलीत तीन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे

कळंबोली : शिक्षण अधिका-यांमध्ये शैक्षणिक नेतृत्व गुण विकसित व्हावा, याकरिता प्रादेशिक विद्या प्राधिकरणाच्या वतीने कळंबोलीत तीन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. मुंबई विभागातील अधिकाºयांनी यामध्ये सहभाग घेतला आहे. संबंधितांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.सध्या महाराष्ट्रात प्रगत शिक्षण कार्यक्र म सुरू आहे. खासगी शिक्षण संस्था त्याचबरोबर इंग्रजी माध्यमाच्या शाळेबरोबर स्पर्धा करण्यासाठी शासकीय शाळांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. त्याकरिता वेगवेगळे उपक्र म राबवले जात आहेत. प्रत्येक जिल्ह्यात तसेच तालुक्यात गुणवत्तेवर आधारित शिक्षण देण्याची जबाबदारी शिक्षणाधिकारी यांच्यावर आहे. शिक्षणाधिकारी हे शिक्षक, केंद्रप्रमुख, शाळा समिती, पालक, विद्यार्थ्यांमधील समन्वयक असतात. शासनाच्या शैक्षणिक योजना, उपक्र म राबविण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते. ते किती प्रभावीपणे हे काम करतात. त्यावर तेथील शैक्षणिक प्रगती बºयाच अंशी अवलंबून असते. एकंदरच संबंधित अधिकारी शैक्षणिक पुढाकार घेत असतात. त्यामध्ये नेतृत्वगुण विकसित करण्याकरिता महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाच्या वतीने मुंबई विभागीय तीन दिवसीय कार्यशाळा कळंबोली येथे मंगळवारपासून सुरू झाली.रायगड, ठाणे, पालघर आणि मुंबईतील शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी आणि सहभागी झाले होते. याकरिता सुनीता राठोड, सुनील अधिक या तज्ज्ञांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी शैक्षणिक नेतृत्व विकास प्रशिक्षण कार्यक्र मांतर्गत शैक्षणिक गुणवत्ता सुधारणा अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. मौलिक वर्ग, खुले चर्चासत्र, अभिव्यक्ती विचार, शैक्षणिक नेतृत्व विकास कार्यक्रमाची माहिती देण्यात आली. गुणवत्ता विकासासाठी पायाभूत बाबी कोणत्या, अधिकारी म्हणून पहिल्या तीन क्रमांकांमध्ये येण्याकरिता सादरीकरण, अनुभव, यशोगाथेचे सादरीकरण या वेळी करण्यात आले. उपसंचालक संघमित्रा त्रिभुवन यांनी प्रास्ताविक केले. विभागीय प्रशिक्षण समन्वयक लिंबाजी गीते यांनी उत्तम नियोजन केले.