शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

राहत्या जागेवर कायदेशीर हक्क

By admin | Updated: February 16, 2017 02:15 IST

महाराष्ट्र कूळवहिवाट व शेतजमीन अधिनियमांतर्गत राज्याच्या महसूल व वन विभागाने ४ जानेवारी २०१७ रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार

अलिबाग : महाराष्ट्र कूळवहिवाट व शेतजमीन अधिनियमांतर्गत राज्याच्या महसूल व वन विभागाने ४ जानेवारी २०१७ रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, आता आदिवासी दलितांसह सर्व जातीय शेतमजूर, कुळांना व ग्रामीण कारागिरांना यामुळे राहत्या जागेवर कायदेशीर हक्क मिळणार आहे, त्यांना आता बेदखल करता येणार नाही, अशी माहिती सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी दिली आहे.जानेवारी २०१७ रोजी महाराष्ट्र शासनाने ही महत्त्वाची अधिसूचना जारी केली आहे. सर्व भूमिहीन शेतमजूर, कुळे, ग्रामीण कारागीर, म्हणजेच बारा बलुतेदार जे खासगी जमिनीवर राहत आहेत, बहुतेक ठिकाणी ते जमीनदार, पूर्वीचे खोत यांच्या जमिनीवर राहत आले आहेत, ते आता राहत्या जागेचे मालक होणार आहेत. त्यांनी आपापल्या राहत्या जागेसंबंधी तहसील कचेरीत पुराव्यासह अर्ज करणे आवश्यक आहे. ३१ मार्चपर्यंत सध्या मुदत आहे. संपूर्ण महाराष्ट्राला ही अधिसूचना लागू असल्याचे महाजन यांनी सांगितले. हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे. जो कूळ कायद्याच्या कलम १७ ब या तरतुदीचा भाग आहे. जी अधिसूचना पूर्वीच निघायला हवी होती; पण आता संघटनेने सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे हे शक्य झाले आहे. या प्रश्नाकडे राज्यपालांचे लक्ष वेधल्यानंतर त्यांनी दिलेल्या आदेशानुसार शासनाने एक समिती गठित केली. या समितीत उल्का महाजन आणि सुरेखा दळवी यांचा समावेश होता.या समितीने शासनाला केलेल्या शिफारशी शासनाने स्वीकारल्या व हा निर्णय ४ जानेवारीला करण्यात आला आहे. आदिवासी दलितांसह सर्व जातीय शेतमजूर, कुळांना व ग्रामीण कारागिरांना यामुळे राहत्या जागेवर कायदेशीर हक्क मिळणार आहे, त्यांना आता बेदखल करता येणार नाही. ही माहिती खेडोपाडी पोहोचणे आवश्यक असल्याचे महाजन यांनी सांगितले.