शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कोपरखैरणे पोस्ट कार्यालयाला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2016 02:09 IST

कोपरखैरणे पोस्ट कार्यालयाच्या छताला गळती लागली आहे. कार्यालयाला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. कागदपत्रे भिजू नयेत यासाठी त्यावर प्लास्टीकचा कागद टाकण्यात आला

नवी मुंबई : कोपरखैरणे पोस्ट कार्यालयाच्या छताला गळती लागली आहे. कार्यालयाला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. कागदपत्रे भिजू नयेत यासाठी त्यावर प्लास्टीकचा कागद टाकण्यात आला असून गळक्या छताखाली बसून कर्मचाऱ्यांना काम करावे लागत आहे. सिडकोने बांधलेल्या मार्केटच्या पहिल्या मजल्यावर पोलीस स्टेशन व पोस्ट कार्यालयाला जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पोस्ट कार्यालयाच्या छताला गळती लागली आहे. कार्यालयात सर्वत्रच पाणी येत असल्याने कर्मचाऱ्यांना बसण्यासाठीही जागा शिल्लक नाही. सर्व कागदपत्रे टेबलवर ठेवून त्यावर प्लास्टीकचा कागद ठेवण्यात आला आहे. कार्यालयाला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले असून त्यामध्ये बसून कर्मचाऱ्यांना दैनंदिन कामे करावी लागत आहेत. स्लॅब कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोणत्याही क्षणी इमारतीचा भाग कोसळून जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रात्री स्लॅब कोसळला तर सर्व कागदपत्रे भिजून जाणार आहेत. पोस्ट कार्यालयाची इमारत दुरूस्त करण्याकडे सिडको व पोस्ट विभाग दुर्लक्ष करत आहेत. पहिल्या मजल्यावर येणाऱ्या जिन्याची स्थिती दयनीय झाली आहे. स्लॅबचा काही भाग कोसळला आहे. उर्वरित स्लॅबही येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांच्या व कर्मचाऱ्यांच्या अंगावर पडण्याची शक्यता आहे. पोस्ट कार्यालयातील कामगारांच्या समस्येकडे सर्वच दुर्लक्ष करत आहेत. कर्मचाऱ्यांना कार्यालयाच्या बाहेरील बाकड्यांवर दुपारी जेवण करावे लागत आहे. लवकरात लवकर दुरूस्तीचे काम करावे किंवा कार्यालयाचे इतर ठिकाणी स्थलांतर करावी, अशी मागणी कर्मचारी व नागरिकांनी केली आहे. (प्रतिनिधी)