शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला गळती

By नामदेव मोरे | Updated: February 16, 2024 19:36 IST

सायंकाळचा पाणी पुरवठा बंद : शनिवारी सकाळी पाणी पुरवठा सुरळीत होणार.

नवी मुंबई : नवी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या मोरबे धरणावरील जलवाहिनीला बेलापूरमध्ये गळती लागली. दुरूस्तीचे काम तत्काळ सुरू केल्यामुळे शहरात सायंकाळी पाणी पुरवठा होऊ शकला नाही. शनिवारी सकाळपासून पाणी पुरवठा पुन्हा सुरळीत होणार आहे.

महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये सीबीडी ते ऐरोली दरम्यान परिसराला मोरबे धरणातून पाणी पुरवठा करण्यात येतो. मुख्य जलवाहिनी पामबीच रोडवरून वाशीकडील मार्गावर टाकण्यात आली आहे. बेलापूर सेक्टर २८ मध्ये सकाळी १० वाजण्याच्या सुमारास जलवाहिनीला गळती लागल्याचे निदर्शनास आले. अभियांत्रीकी विभागाने तत्काळ जलवाहिनीवरील पाणी पुरवठा थांबवून दुरूस्तीचे काम सुरू केले. सायंकाळी ६ वाजल्यानंतरही दुरूस्तीचे काम सुरू होती. रात्री ८ पर्यंत दुरूस्तीचे काम पूर्ण होईल अशी माहिती अभियांत्रीकी विभागाने दिली. नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहनही करण्यात आले आहे. जलवाहिनी फुटल्यामुळे नवी मुंबईतील सायंकाळचा पाणी पुरवठा बंद करण्यात आला होता. शनिवारी सकाळी पाणी पुरवठा पुन्हा पुर्ववत होईल अशी माहिती महानगरपालिका प्रशासनाने दिली आहे. जलवाहिनी फुटली की फोडलीसीबीडी बेलापूर येथे जलवाहिनीला गळती लागल्यामुळे तत्काळ दुरूस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. परंतु जलवाहिनीला गळती कशी लागली असा प्रश्न उपस्थित होत आहे. टँकर चालकांनी जलवाहिनीला छेद करण्याचा प्रयत्न केला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. महानगरपालिका प्रशासनही याविषयी चौकशी करत असून जलवाहिनीशी छेडछाड केल्याचे स्पष्ट झाल्यास संबंधीतांवर कारवाई केली जाणार आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई