शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

मराठी भाषेची सक्ती ठरणार महत्त्वाचे वळण- लक्ष्मीकांत देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 01:00 IST

वाशीत मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कार्यक्रम

नवी मुंबई : राज्यातील शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची निर्णय निश्चितच स्वागतार्ह आहे. भावी पिढीच्या जडणघडणीसाठी हे महत्त्वाचे वळण ठरणार आहे. यामुळे ज्येष्ठ कवी सुरेश भट यांच्या ‘लाभले आम्हांस भाग्य’ या कवितेत व्यक्त केलेली भावना प्रत्यक्षात साकार होतील, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले.मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून वाशीतील साहित्य मंदिर सभागृहात, मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळाच्या वतीने गुरुवारी आयोजित कार्यक्रमात प्रमुख्य व्याख्याते म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘लोकमत’चे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर उपस्थित होते.देशमुख म्हणाले, प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी चित्रपट आणि नाट्य संकुल उभारावे, लोककलांचे प्रशिक्षण मराठी मध्येच देण्याची व्यवस्था व्हावी, त्यामध्ये पटकथा, नेपथ्य, दिग्दर्शन, नृत्य, संगीत यांचा समावेश असावा. या कलांचे प्रशिक्षण देण्यासाठी मराठी कलाकार आपल्याकडे मोठ्या संख्येने उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.मराठी संस्कृती श्रेष्ठ आहे. ती सिनेमातून जगाला कळू शकते. तो प्रयत्न व्हायला हवा. महाराष्ट्रातील १०० शहरांमध्ये कला महोत्सव होतात. त्यामध्ये लावणी, शास्त्रीय संगीत यांचा समावेश असतो. त्यांना व्यासपीठ मिळण्यासाठी सरकारने विशेष मराठी वाहिनी सुरूकरण्याची अपेक्षा देशमुख यांनी व्यक्त केली.प्रसारमाध्यमांमध्ये काम करताना भाषेची उत्तम जाण असणे आवश्यक आहे. समाजामधील विविध वर्गातील वाचकवर्गाचा विचार करून भाषेची योजना करावी लागते, मराठीला ऊर्जितावस्था प्राप्त करण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत, असे विचार कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ‘लोकमत’चे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर यांनी व्यक्त केले. या वेळी मराठी साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सुभाष कुलकर्णी यांनी मान्यवरांचा सत्कार केला.