शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

कार्यशाळेत श्रींच्या मूर्तींवर अखेरचा हात

By admin | Updated: August 12, 2016 02:36 IST

गणेशाच्या आगमनाकरिता अवघे काहीच दिवस शिल्लक राहिले असून शहरातील चित्रशाळांमध्ये बाप्पाच्या मूर्तीवर शेवटचा हात फिरवला जात आहे.

प्राची सोनवणे,  नवी मुंबई गणेशाच्या आगमनाकरिता अवघे काहीच दिवस शिल्लक राहिले असून शहरातील चित्रशाळांमध्ये बाप्पाच्या मूर्तीवर शेवटचा हात फिरवला जात आहे. माती, रंग, प्लास्टर आॅफ पॅरिस आदी कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने मागील वर्षीच्या तुलनेत मूर्तींमध्ये २० टक्के दराने वाढ झाली आहे. गणेशचतुर्थीच्या महिनाभर आधीच मूर्तीच्या बुकिंगला सुरुवात होते. मूर्तीचे डोळे, दागिने आदि रंगरंगोटीचे काम सुरु आहे. मूर्ती तयार करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याच्या किमती वाढल्याने मूर्तिकारांनी मजुरीमध्ये २०० ते २५० रुपयांनी वाढ केली आहे. इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सर्वच भागांतून शाडूच्या गणेशमूर्तींना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मागील वर्षी २०० ते २५० रुपये दराने विकली जाणारी शाडूच्या मातीची गोण यंदा ३५० ते ४०० रुपये दराने मिळत आहे. शाडूच्या मूर्तींच्या किमतींमध्ये झालेली वाढ तसेच हाताळण्यास नाजूक असल्याने मोठमोठ्या गणेशोत्सव मंडळांकडून मात्र अजून प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तींनाच मागणी असल्याची माहिती मूर्तिकारांनी दिली आहे. मूर्तीसाठी वापरले जाणारे सोनेरी, चंदेरी रंगांच्या किमती वाढल्या आहेत. विविध रूपातील मूर्ती तयार करून घेण्यासाठी भाविकांनी सहा महिने अगोदरही मूर्तींचे बुकिंग केले आहे. 1नवी मुंबईतील सायली कला केंद्र या चित्रशाळेत सध्या तिसरी पिढी श्री मूर्ती घडवित आहे. तरुण मूर्तिकारांनी आजोबांकडून मूर्ती घडविण्याचे धडे घेतले असून अभियांत्रिकी, एमबीए, पदवी शिक्षणानंतरही मूर्ती साकारात आहे. पिढ्यानपिढ्या मूर्ती घडवित असल्याने घरातील प्रत्येक व्यक्ती मूर्ती घडविण्याच्या कामात सहभागी असल्याची प्रतिक्रिया मूर्तिकार जनार्दन नाईक यांनी व्यक्त केली. 2पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने गेली कित्येक वर्षे या चित्रशाळेत शाडूच्या मातीपासून मूर्ती तयार केल्या जात आहेत. सण, उत्सव साजरे करताना आजूबाजूच्या पर्यावरणावर त्याचा वाईट परिणाम होणार नाही याची दक्षता घेणे ही प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याचा मोलाचा सल्ला मूर्तिकार नाईक यांनी दिला.