शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षांत ६३२ विंधण विहिरींना लागले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 03:54 IST

दरवर्षी रायगड जिल्ह्यातील काही गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवते. त्यामुळे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून अशा गावांमध्ये विंधण विहिरी खोदल्या जातात

मयूर तांबडे पनवेल : दरवर्षी रायगड जिल्ह्यातील काही गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवते. त्यामुळे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून अशा गावांमध्ये विंधण विहिरी खोदल्या जातात. गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यातील गाव, पाड्यांमध्ये शेकडो विंधण विहिरी खोदल्या गेल्या आहेत. २०१२ ते १७ या पाच वर्षांत ६३२ विंधण विहिरी यशस्वी तर २२१ अयशस्वी झाल्या आहेत.एप्रिल-मे महिन्यात दरवर्षी रायगड जिल्ह्यात पाणीटंचाई जाणवते. शासकीय पातळीवर पाणीटंचाई दूर करण्यासाठी यासाठी प्रयत्न केले जातात. मात्र, तरी देखील पाणीटंचाई कमी होत नसल्याचे दिसत आहे. गाव, आदिवासी वाडे, पाडे आदी ठिकाणी पाणीटंचाईच्या झळा पोहोचत आहेत. पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे. त्यामुळे २०० फुटांवर खोदण्यात येणाऱ्या विंधण विहिरी अयशस्वी होत आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून प्रत्येक तालुक्यातील संभाव्य टंचाईग्रस्त गावांच्या यादीसोबतच या टंचाईवर मात करण्यासाठी कृती आराखडा दरवर्षी तयार केला जातो. त्यानुसार मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांतील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन संभाव्य टंचाईग्रस्त गावांत विंधण विहिरी मंजूर केल्या जातात. या विंधण विहिरी मारण्यासाठी २०० फुटांची मर्यादा असते. मात्र, पाण्याची पातळी खाली गेलेली असल्याने यातील काही विंधण विहिरींना पाणी लागत नाही. त्यामुळे दुष्काळात तेरावा महिना अशी गत या टंचाईग्रस्त गाव-पाड्यांची होते.मार्च महिना उजाडला की जिल्ह्यातील काही गावे, पाडे यामध्ये पाणीटंचाई जाणवते. उन्हाचा पारा दिवसेंदिवस चढत असल्याने पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होते. पावसाळ्याच्या दिवसात पाणी अडवून ते जास्तीत जास्त जमिनीत जिरवले पाहिजे. जेणेकरून भविष्यात पुरेसा पाणीसाठा जमिनीत होईल व त्याचा टंचाईकाळात लाभ होईल. काही गावांमध्ये मार्चपासूनच पाण्याचा खडखडाट होत असल्याने तीव्र पाणीटंचाई निर्माण होते.