शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
एअर सायरन वाजणार, ब्लॅकआऊट होणार; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात 'वॉर मॉक ड्रिल'
3
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
4
जातीय जनगणनेबाबत मल्लिकार्जुन खरगे यांचे पीएम मोदींना पत्र; केल्या तीन महत्वाच्या सूचना...
5
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
6
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
7
सिंधु करार मोडून भारताने उचललं मोठं पाऊल! पाकिस्तानात नेमकी किती पाणी टंचाई भासणार?
8
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
9
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
10
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
11
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...
12
'मी शाहरुख...', MET GALA मध्ये परदेशी मीडियाने बॉलिवूडच्या बादशहाला ओळखलंच नाही?
13
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
14
संपूर्ण दिवस बेशुद्ध अन् ICU मध्ये उपचार, 'इंडियन आयडॉल' फेम पवनदीपची हेल्थ अपडेट समोर
15
"हा माझ्या होणाऱ्या मुलाचा बाप..."; साखरपुड्यात गर्लफ्रेंडची एन्ट्री, उघड केली नवरदेवाची गुपितं
16
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? भारताच्या धाकाने मोठमोठ्या विमान कंपन्यांनी मार्ग बदलले
17
बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार! पोलिसांकडून अभिनेत्याचा शोध सुरू
18
इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांसाठी मोठा झटका! सरकारने चार्जिंगचे नियम बदलले
19
बेस्ट बसची दुप्पट दरवाढ 'या' तारखेपासून लागू; आता प्रवाशांना मोजावे लागणार इतके पैसे
20
भारत- पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगांची भाकीत काय सांगतात? वाचा सविस्तर

बापट वाडा मोजतोय अखेरची घटका

By admin | Updated: July 27, 2016 03:22 IST

ऐतिहासिक वाड्यांचे शहर म्हणून एकेकाळी पनवेल शहराचा नावलौकिक होता. शहरात आजही ऐतिहासिक वास्तूंच्या खाणाखुणा पहायला मिळत असून या ऐतिहासिक वास्तूंची

- वैभव गायकर ,  पनवेल

ऐतिहासिक वाड्यांचे शहर म्हणून एकेकाळी पनवेल शहराचा नावलौकिक होता. शहरात आजही ऐतिहासिक वास्तूंच्या खाणाखुणा पहायला मिळत असून या ऐतिहासिक वास्तूंची नोंद विविध संग्रहालयात पाहावयास मिळत आहे. मात्र वाढत्या नागरीकरणामुळे शहरातील ऐतिहासिक वास्तूंचा ऱ्हास होत आहे. एकेकाळी शहराची शान म्हणून ओळखला जाणारा बापट वाडा देखभाल दुरुस्तीअभावी सध्या अखेरची घटका मोजत आहे. सुमारे २९७ वर्षांपासून पनवेल शहरात डौलात उभा असलेल्या बापट वाड्याची पडझड सुरू आहे. १७२० मध्ये हा बापट वाडा बांधला गेला. पेशवेकालीन चिमाजी आप्पा जेव्हा वसईच्या स्वारीला चालले असताना त्यांच्या सैन्याला बापटांनी रसद पुरविली होती. बापट कुटुंबाकडे त्यावेळी पनवेलची वतनदारी पेशव्यांनी बहाल केली होती. सध्या बापट वाड्यात ५० पेक्षा जास्त कुटुंबे राहत आहेत. वाड्याचा काही भाग मोडकळीस आला असून छतही अनेक ठिकाणी निखळले आहे. मात्र आजही पनवेलमध्ये गोकुळाष्टमी साजरी करताना सर्वात पहिली दहीहंडी बापट वाड्यातीलच फोडली जाते. यावेळी सर्व दहीहंडी पथक, सर्व देवस्थानातील पदाधिकारी याठिकाणी जमतात. तीनशे वर्षे जुन्या या वाड्याचे बांधकाम अतिशय नियोजनबद्ध पध्दतीने केले गेले आहे. १७३० मध्ये बापटांनी पंढरपूरवरून विठ्ठल रखमाईची मूर्ती आणून त्यांची स्थापना याठिकाणी केली. तेव्हापासून आजतागायत याठिकाणी गोकुळाष्टमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. बापट वाड्याची योग्य देखभाल दुरुस्ती न झाल्यास लवकरच ही ऐतिहासिक वास्तू लुप्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या वास्तूचे योग्य प्रकारे जतन करण्यात यावे अशी मागणी, वाड्यातील रहिवासी कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे. वाड्याचे बांधकामवाड्याचे बांधकाम हे विटा व मातीने असून आत दोन विहिरी आहेत. तसेच वाड्यात दोन चौक देखील बांधलेले आहेत. सध्या याठिकाणी बापटांची आठवी पिढी राहत आहेत, तर काही घरे भाड्याने देण्यात आली आहेत. वाड्याची सद्य:स्थितीशहराची शान म्हणून तीनशे वर्षे डौलात उभा राहिलेला हा वाडा अखेरची घटका मोजत आहे. वाड्याचे छत निखळलेले आहे. भिंती देखील पोकळ झालेल्या आहेत. वरचा मजला देखील मोडकळीस आलेला आहे.