शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोमध्ये घरांच्या अर्जदारांना अखेरची संधी""

By admin | Updated: May 1, 2017 06:45 IST

विविध गृहप्रकल्पातील घरांसाठी सिडकोने सोडत काढली होती. या सोडतीत यशस्वी ठरलेल्या अर्जदारांनी निर्धारित

नवी मुंबई : विविध गृहप्रकल्पातील घरांसाठी सिडकोने सोडत काढली होती. या सोडतीत यशस्वी ठरलेल्या अर्जदारांनी निर्धारित वेळेत पैशांचा भरणा न केल्याने त्यांना सहा महिन्यांची मुदत देण्यात आली होती. ही मुदत ३0 एप्रिल रोजी संपत असल्याने अर्जदारांच्या सोयीसाठी ही मुदत मंगळवार २ मेपर्यंत वाढविण्यात आली आहे. या मुदतीनंतर संबंधित अर्जदारांना कोणतीही संधी मिळणार नसल्याचे सिडकोकडून स्पष्ट करण्यात आले आहे.सिडकोने विविध उत्पन्न गटातील घटकांसाठी स्वप्नपूर्ती, वास्तुविहार/सेलिब्रेशन, व्हॅलिशिल्प, सीवूड्स इस्टेट आणि उन्नती हे गृहप्रकल्प उभारले आहेत. संगणकीय सोडतीद्वारे यातील घरांचे वाटप करण्यात आले आहे. त्यानुसार पात्र ठरलेल्या अर्जदारांना वाटपपत्र देण्यात आले. वाटपपत्र प्राप्त झालेल्या अर्जदारांनी तीन महिन्यांच्या आत सदनिकेच्या किमतीची रक्कम भरणे आवश्यक होते. त्यासाठी मुदतवाढ देण्याची विनंती ग्राहकांनी केली होती. त्यानुसार सिडकोने संचालक मंडळाच्या बैठकीत विशेष ठराव पारित करून विलंब शुल्कासह पैसे भरण्यासाठी सहा महिन्यांची मुदत दिली होती. ३0 एप्रिल रोजी ही मुदत संपत आहे; परंतु शेवटच्या दोन दिवसांत शनिवार आणि रविवार येत असल्याने ग्राहकांच्या सोयीसाठी ही मुदत २ मेपर्यंत वाढविण्यात आली आहे. या वाढीव मुदतीच्या आत जे सदनिकाधारक विलंब शुल्कासह पैशांचा भरणा करणार नाहीत, त्यांचे वाटपपत्र रद्द केले जाणार आहे, तसेच नियमानुसार नोंदणी शुल्काची संपूर्ण रक्कम व भरलेल्या हप्त्यांच्या दहा टक्के रक्कम जप्त करून संबंधित प्रकरण निकाली काढले जाईल, असे सिडकोने स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)