शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ऐरोलीतील ‘त्या’ इमारतीवर अखेर कारवाई

By admin | Updated: June 14, 2017 03:28 IST

ऐरोली सेक्टर २0 येथे बनावट बांधकाम परवानगीच्या (सीसी) आधारे उभारण्यात आलेल्या इमारतीवर अखेर मंगळवारी कारवाई करण्यात आली. सिडको व महापालिकेची

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : ऐरोली सेक्टर २0 येथे बनावट बांधकाम परवानगीच्या (सीसी) आधारे उभारण्यात आलेल्या इमारतीवर अखेर मंगळवारी कारवाई करण्यात आली. सिडको व महापालिकेची फसवणूक करणाऱ्या संबंधित विकासकावर एमआरटीपी अ‍ॅक्टनुसार कारवाई करणार असल्याचे सिडकोकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ऐरोली सेक्टर २0 बी येथील ५२ क्रमांकाच्या भूखंडावर सात मजली बेकायदा इमारत उभारण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही इमारत उभारताना संबंधित ओम साई डेव्हलपर्स या विकासकाने बनावट बांधकाम परवानगीचा आधार घेतल्याचे उघड झाले आहे. या सात मजली इमारतीत एकूण ४९ फ्लॅट असून त्यापैकी ३0 फ्लॅटची यापूर्वीच विक्री करण्यात आली आहे, तर उर्वरित फ्लॅट भाडेतत्त्वावर देण्यात आले आहेत. या इमारतीची बांधकाम परवानगी बोगस असल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर सिडकोच्या वतीने संबंधित विकासकाला वारंवार नोटिसा बजावण्यात आल्या. तसेच इमारतीतील घरे न विकण्याच्या सूचना करण्यात आल्या. परंतु त्यानंतरही विकासकाने घरे विकून अनेक कुटुंबांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. इमारतीचे बांधकाम सुरू असताना २0१५ मध्ये सिडकोने संबंधित विकासकाला नोटीस बजावून बांधकाम थांबविण्याच्या सूचना केल्या होत्या. परंतु या विकासकाने या नोटीसला न्यायालयातून स्थगिती आणून बांधकाम सुरूच ठेवले होते. सध्या इमारतीच्या तीन ते सातव्या मजल्यापर्यंतचे बांधकाम प्रगतिपथावर होते. बांधकामाला न्यायालयाची स्थगिती असतानाही बांधकाम सुरू ठेवून विकासकाने न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी सिडकोने नोटीस बजावली होती. या नोटिसीच्या अनुषंगाने मंगळवारी धडक कारवाई करण्यात आली. याअंतर्गत इमारतीच्या वरचे चार मजले ब्रेकरच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आले. दरम्यान, ग्राहकांनी घरे घेताना कागदपत्रांची तपासणी करून घ्यावेत, असे आवाहन सिडकोच्या वतीने करण्यात आले आहे. सिडकोच्या अतिक्रमण विभागाचे नियंत्रक पी.बी. राजपूत, सहाय्यक नियंत्रक गणेश झिने, महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे अधिकारी नीलेश मोरे, सहाय्यक अभियंता एम.सी. माने आदी उपस्थित होते. या कारवाईसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.