शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

एमआयडीसीच्या पाण्यात अळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 23:50 IST

नवी मुंबई शहरातील पावणे ते दिघा भागातील नागरिकांना एमआयडीसीकडून पाणीपुरवठा केला जातो.

नवी मुंबई : नवी मुंबई शहरातील पावणे ते दिघा भागातील नागरिकांना एमआयडीसीकडून पाणीपुरवठा केला जातो. दिघा येथे या पाण्यात अळ्या आढळल्या आहेत, त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शनिवार, १ नोव्हेंबर रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत राष्ट्रवादीचे नगरसेवक नवीन गवते यांनी प्रशासनाला धारेवर धरत प्रशासनाचे दिघा भागात दुर्लक्ष असून, नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप त्यांनी केला.नवी मुंबई महापालिकेच्या मालकीच्या असलेल्या मोरबे धरणातू संपूर्ण शहराला पाणीपुरवठा केला जात नाही. पावणे ते दिघा भागात एमआयडीसीकडून पाणीपुरवठा केला जातो. आठवड्यातून एक दिवस एमआयडीसीकडून पाणी बंद ठेवण्यात येते, तसेच त्यानंतर दोन-तीन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा केला जातो. दिघा भागात पाण्याचा साठा करून ठेवण्यासाठी उच्चस्तरीय आणि भूमिगत जलकुंभ नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शनिवारी या पाण्यात अळ्या आढळल्याने नागरिकांच्या आरोग्याचा मुद्दा ऐरणीवर आला असून, नागरिकांमध्ये घबराहट पसरली आहे. महापालिकेचे कार्यकारी अभियंता संजय देसाई यांनी महापे ते दिघा पाण्याच्या लाइनचे काम सुरू असून, आॅगस्टपर्यंत पूर्ण करण्याच्या अनुषंगाने नियोजन करण्यात आल्याचे सांगितले. एमआयडीसीकडून पुरवठा होणाऱ्या पाण्याची पाहणी करून पाण्याच्या लाइन स्वच्छ करण्याबाबत एमआयडीसीलाला सांगण्यात येईल. ओएस वनच्या भूखंडावर पाण्याच्या अनुषंगाने टाक्यादेखील बांधण्यात येणार असल्याचे सांगितले. शिवसेनेचे नगरसेवक द्वारकानाथ भोईर यांनी एमआयडीसी जरी पाणीपुरवठा करीत असली, तरी महापालिकेच्या अधिकाºयांनी याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे सांगत अधिकाºयांचे याकडे दुर्लक्ष झाले असल्याने नागरिकांच्या जीवाशी खेळ चालला असल्याचा आरोप त्यांनी केला. स्थायी समितीचे सभापती सुरेश कुलकर्णी यांनी पाण्याचे नमुने तपासण्यात यावेत, अधिकाºयांनी त्वरित त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करावी आणि असे प्रकार घडू नयेत, या दृष्टीने काळजी घेण्याचे आदेश प्रशासनाला दिले.