शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईमध्ये जाळ्यात अडकलेल्या लंगूरच्या पिलाला जीवदान

By योगेश पिंगळे | Updated: September 1, 2023 17:26 IST

सीबीडी सेक्टर ९ येथे गुरुवारी संध्याकाळी माकडाचे पिलू अडकल्याची माहिती  पुनर्वसु फाउंडेशनचे संस्थापक प्रितम दिलीप भुसाणे व माधव गायकवाड तसेच सर्पमित्र अनिकेत गायकवाड याना समजताच ते तात्काळ घटनेच्या ठिकाणी पोहचले.

नवी मुंबई : सीबीडी सेक्टर ९ येथील घराच्या टेरेसवरून झाडांच्या वेली सोडण्यासाठी बसविण्यात आलेल्या जाळीत लंगूर माकडाच्या पिलाचा पाय अडकल्याने ते अडकून बसले होते. पुनर्वसू फाउंडेशनच्या सर्पमित्रांनी या पिलाची सुखरूपरित्या सुटका करून पिलाला जीवदान दिले. 

सीबीडी सेक्टर ९ येथे गुरुवारी संध्याकाळी माकडाचे पिलू अडकल्याची माहिती  पुनर्वसु फाउंडेशनचे संस्थापक प्रितम दिलीप भुसाणे व माधव गायकवाड तसेच सर्पमित्र अनिकेत गायकवाड याना समजताच ते तात्काळ घटनेच्या ठिकाणी पोहचले. या माकडाच्या पिलाची पाहणी केली असता घराच्या टेरेसवरून झाडाच्या वेळी सोडण्यासाठी बसविण्यात आलेल्या जाळीत लंगूर जातीच्या माकडाचे पिलू अडकल्याचे त्यांच्या लक्षात आले. हे पिलू सुमारे चार तासाहून अधिक काळापासून अडकले होते. दुसऱ्या माकडांनी त्याला काढण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना ते शक्य झाले नव्हते. या पिलाच्या रक्षणासाठी त्याचे आई वडील बाजूलाच बसले होते. ते कोणालाही पिलाजवळ येऊ देत न्हवते.

पुनर्वसु टीमने जागेची पाहणी करून पिल्लू १५ फूट उंचीवरवर अडकले असल्यामुळे शिडीवर चढून त्याला काढण्याचा प्रयत्न सुरु केल्यावर माकडांनी आरडाओरड सुरू केली. त्यावेळी ऋषी पाटील, अविनाश रोकडे तसेच काही स्थानिक तरुणांनी या माकडांना लांब ठेवण्यासाठी प्रयत्न केले. पुनर्वसूच्या सदस्यांनी काही वेळातच पिलाला हातात घेतल्यावर माकडे देखील शांत झाली. प्रसंगावधान राखत पुनर्वसु फाऊंडेशनचे प्रितम, माधव व अनिकेत यांनी त्या माकडाच्या पिल्लाला सुखरूप ताब्यात घेतले. त्याच्या पायात गुंतलेल्या जाळीचा धागा काढण्यात आला. त्यानंतर त्या पिलाची पाहणी करून त्याला कोणतीही इजा तर झाली नाही याची खात्री करून पिलाला त्याच्या आई वडिलांजवळ सुखरूपरित्या सोडण्यात आले. उपस्थित नागरिकांनी पुनर्वसु फाउंडेशनचे आभार मानले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई