शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांना भूमिपुत्रांनी लावले पिटाळून

By admin | Updated: November 17, 2016 05:15 IST

शासनाने विकासाच्या नावावर अणुऊर्जा प्रकल्प, थर्मल पॉवरची उभारणी करून स्थानिक जनतेची कशी फसवणूक केली आहे,

हितेन नाईक

पालघर : वाढवण बंदर उभारणीबाबत वाढवण, वरोरच्या ग्रामस्थांशी चर्चा करण्यासाठी आलेल्या जेएनपीटीच्या अधिकाऱ्यांना आमचा एकमताने विरोध असल्याचे ग्रामस्थांनी ठणकावून सांगीत बुधवार पर्यंत शासनाने विकासाच्या नावावर अणुऊर्जा प्रकल्प, थर्मल पॉवरची उभारणी करून स्थानिक जनतेची कशी फसवणूक केली आहे, हे आम्ही उघड्या डोळ्यांनी पहात असून शेवटच्या श्वासा पर्यंत बंदराला विरोध करण्याचा मनसुबा स्थानिकांनी यावेळी व्यक्त केला व अधिकाऱ्यांना परत पाठविले. डहाणू तालुक्यातील वाढवण येथे सन १९९८ साली पी अँड ओ या आॅस्ट्रोलियन कंपनीने २९ धक्यांचे उभारीत असलेल्या प्रस्तावित बंदराला डहाणू ते पालघर मधील मच्छिमार, डायमेकर, दलित, आदिवासी ई. समाजाने एकजुटीने विरोध केला होता. व ते हाणून पाडले होते. डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरणानेही परवानगी नाकारल्याने शासनाला ते बंदर रद्द करावे लागले होते. त्यामुळे शेकडो वर्षा पासून मासेमारी, बागायती क्षेत्रासह डायमेकिंग व्यवसाय करून शांततेने आपला उदरनिर्वाह करणाऱ्या ग्रामस्थांना दिलासा मिळाला होता. अशा वेळी स्थानिकांना उध्वस्त करणारा हे बंदर आता १८ वर्षांनी पुन्हा एकदा येथील माथी मारण्याचा प्रयत्न केला जात असल्याने असंतोष आहे. वाढवणच्या किनाऱ्यापासून समुद्रात ४.५ नॉटिकल मैल खोल समुद्रात हे बंदर उभारण्यात येणार असून कोणतेही गाव विस्थापित केले जाणार नसून एक इंच ही जमीन संपादित केली जाणार नाही अशी फसवी विधाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केल्याने ग्रामस्था मधून संताप व्यक्त केला जात आहे. या बंदरा बाबत करण्यात आलेल्या सामंजस्य करारात म्हटल्याप्रमाणे या बंदरातील माल उतरविण्यासाठी चौपदरी रस्ते आणि रेल्वे ट्रॅक उभारणीसाठी मोठ्या प्रमाणात जमीन संपादित करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. या बंदरात कोळसा, आॅइल, धान्य, रसायन, सिमेंट ई ची कंटेनर द्वारे वाहतूक केली जाणार असून वार्षिक १३२ मिलियन टन इतकी प्रचंड क्षमता या बंदराची आहे. त्यामुळे या मालाच्या वाहतूकीसाठी जमीन लागणार असल्याने शासन खोटी माहिती देऊन स्थानिकांच्या भावनांशी खेळत असल्याचा आरोप होत आहे. त्याचे कोणतेही उत्तर नाशासनाकडे आहे, ना अधिकाऱ्यांकडे.