शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
6
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
7
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
8
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
9
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
10
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
11
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
12
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
13
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
14
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
16
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
17
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
18
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
19
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
20
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले

भूमिपुत्र करणार बेमुदत धरणे आंदोलन

By admin | Updated: February 20, 2017 06:40 IST

विनंत्या अर्ज करूनही सरकार फक्त आश्वासन देत असेल तर आता प्रकल्पग्रस्तांच्या न्याय हक्कांसाठी निकराचा लढा दिला

नवी मुंबई : विनंत्या अर्ज करूनही सरकार फक्त आश्वासन देत असेल तर आता प्रकल्पग्रस्तांच्या न्याय हक्कांसाठी निकराचा लढा दिला जाईल. प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी अर्थसंकल्प अधिवेशनादरम्यान बेमुदत धरणे आंदोलन व उपोषण करण्याचा इशारा आगरी कोळी युथ फाऊंडेशनने दिला आहे. नवी मुंबई वसविण्यासाठी भूमिपुत्रांनी १०० टक्के जमिनीचा त्याग केला. सरकारकडून जमिनीच्या मोबदल्यात अत्यंत तुटपुंजी रक्कम व ४५ वर्षांची उपेक्षा वाट्याला आली. संघर्ष केल्याशिवाय प्रकल्पग्रस्तांची एकही मागणी कधीच मान्य केलेली नाही. अर्ज व विनंत्यांना कचऱ्याची टोपली दाखविण्यात येत आहे. गरजेपोटी बांधलेली घरे, साडेबारा टक्के योजनेचे भूखंड, सार्वजनिक सुविधा, गावठाणांमधील प्रलंबित प्रश्न, प्रकल्पग्रस्तांना रोजगार व इतर अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याचे कोरडे आश्वासन दिले जात आहे. यामुळे आता सरकारला जाब विचारण्याचा निर्णय भूमिपुत्र तरूणांनी घेतला आहे. आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी नुकतीच कोपरखैरणेमधील खारी कळवा शेतकरी संघटनेच्या सभागृहात बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला २८ गावांमधील ३०० पेक्षा जास्त तरूण सहभागी होते. विशेष म्हणजे यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. नवी मुंबईमध्ये जर इथला भूमिपुत्र सुखाने जगू शकत नसेल तर इतर कोणालाही नवी मुंबईत सुखाने जगण्याचा अधिकार नाही, असा इशारा यावेळी शासन व प्रशासनाला देण्यात आला. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे. अधिवेशनाच्या दरम्यान बेलापूरमध्ये मैदानावर उपोषण व धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनामध्ये जास्तीत जास्त भूमिपुत्रांचा सहभाग व्हावा यासाठी गाव बैठका घेण्याचे निश्चित करण्यात आले. कोपरखैरणेमध्ये झालेल्या बैठकीला युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष नीलेश पाटील, मनोज म्हात्रे, मंगेश म्हात्रे, रवी मढवी, भानुदास भोईर, अरविंद पाटील, सुभाष म्हात्रे व इतर तरूण उपस्थित होते.शासन व प्रशासनाला इशारा प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न सोडविले जात नसल्याने प्रकल्पग्रस्त तरूणाईमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. कोपरखैरणेमध्ये झालेल्या बैठकीमध्ये भूमिपुत्रांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. नवी मुंबईमध्ये जर इथल्या भूमिपुत्रांना सुखाने जगता येत नसेल तर इतर कोणालाही सुखाने जगण्याचा अधिकार नाही, असा स्पष्ट इशारा शासन व प्रशासनाला देण्यात आला.