शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भूमिहीन मजुरांनीही घेतली शहराकडे धाव

By admin | Updated: May 15, 2016 04:07 IST

राज्यातील दुष्काळाचे संकट, पावसावर आधारीत शेती, भूमिहीन, स्थानिक रोजगारांच्या संधी न मिळाल्याने आदिवासी बांधवांनी शहराकडे धाव घेतली आहे.

प्राची सोनवणे, नवी मुंबई राज्यातील दुष्काळाचे संकट, पावसावर आधारीत शेती, भूमिहीन, स्थानिक रोजगारांच्या संधी न मिळाल्याने आदिवासी बांधवांनी शहराकडे धाव घेतली आहे. उपजीविकेचे एकमेव साधन असलेल्या राज्याच्या पोशिंद्यावर आत्महत्येची वेळ आली असून दुसऱ्याच्या शेतावर काम करणाऱ्या मजुरांनी कसे घर चालवायचे, असा प्रश्न समोर उभा राहिल्याची प्रतिक्रिया विदर्भातील किशोर पवार यांनी दिली. गावाकडे उपासमारीची वेळ आल्याने कुटुंबासोबत नवी मुंबई स्थलांतर केलेल्या पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना मिळेल ते काम करून दोन वेळच्या जेवणाची सोय करीत असून, कसाबसा संसाराचा गाडा ओढत असल्याचे सांगितले.बेलापूर परिसरातही २०हून अधिक कुटुंबे स्थलांतरित झाली असून, दुष्काळाची झळ सोसणे मुश्कील झाल्याने गाव सोडून शहराची वाट धरली आहे. या कुटुंबीयांनी आपल्या चिमुकल्यांबरोबर ठिकठिकाणी उघड्यावर संसार थाटला असून, शहरातही अनेक समस्यांशी झुंजावे लागत असल्याची प्रतिक्रिया या स्थलांतरित कुटुंबीयांनी व्यक्त केली. अनेकवेळा लाठीमार करून उठविले जात असून, मग आम्ही राहायचे कुठे, असा प्रश्न त्यांना भेडसावत आहे. आम्ही झोपड्या बांधून राहत नाही, पण जिथे झोपण्यापुरता जागा मिळेल तिथे आम्ही आमच्या कुटुंबाची सोय करतो; तरीदेखील आम्हाला प्रत्येक परिसरातून हाकलण्यात येथे. शहरातील नागरिक तसेच तिथल्या प्रशासनाला आम्हाला कसलाही त्रास द्यायचा नसतो, पण आम्हाला एखादी जागा मिळवून दिली दर पावसाळ्यापर्यंत तरी आमच्या पोराबाळांना उघड्यावर राहावे लागणार नाही, अशी प्रतिक्रिया यवतमाळ जिल्ह्यातून आलेल्या जयहिंद पवार यांनी व्यक्त केली. बांधकाम, वीटभट्टी, खाणकाम अशी कामे करून शहरात रोजगार मिळवतो, परंतु रोजच्या रोज हाताला काम मिळत नसल्याने कुटुंबाची उपासमार होते. महागाई वाढल्याने दोन वेळची भूक भागविण्यासाठीही दिवसभर कामधंदा शोधत फिरावे लागते. दारोदारी जाऊन पाणी मागून तहान भागवावी लागते.