शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

जंगल सत्याग्रहाची भूमी उपेक्षितच, ८७ वर्षे शासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 00:33 IST

इंग्रजांच्या अन्यायाविरोधात १९३० मध्ये देशभर जंगल सत्याग्रह सुरू करण्यात आला. उरण तालुक्यातील चिरनेरमध्ये २५ सप्टेंबरला झालेल्या ऐतिहासिक आंदोलनामध्ये १३ भूमिपुत्रांनी हौतात्म्य पत्करले.

नामदेव मोरे, वैभव गायकरनवी मुंबई : इंग्रजांच्या अन्यायाविरोधात १९३० मध्ये देशभर जंगल सत्याग्रह सुरू करण्यात आला. उरण तालुक्यातील चिरनेरमध्ये २५ सप्टेंबरला झालेल्या ऐतिहासिक आंदोलनामध्ये १३ भूमिपुत्रांनी हौतात्म्य पत्करले. ८७ वर्षांनंतरही आंदोलनाच्या ठिकाणी भव्य स्मारक उभारण्याकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. स्मृतिदिनी शासकीय मानवंदना वगळता या ठिकाणाकडे कोणीच फिरकत नसल्याने स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वाची घटना व भूमिपुत्रांचे हौतात्म्य विस्मरणात जावू लागले आहे.जुलमी इंग्रज सरकारने १९३० च्या दरम्यान आदिवासींचा जंगलावरील हक्क नाकारला. जंगलातून लाकूड, गवत गोळा करणे, फळे व वनौषधी गोळा करण्यावरही निर्बंध लाधले. गाई - म्हशींनाही जंगलात सोडण्यास मज्जाव करण्यात आला. या अन्यायाविरोधात देशभर आंदोलन सुरू झाले. देशातील पहिला जंगल सत्याग्रह सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील बिळशी येथे झाला. १८ जुलै ते ५ सप्टेंबर १९३० दरम्यान तेथे आंदोलन करण्यात आले. यानंतर देशातील सर्वात मोठा जंगल सत्याग्रह उरण तालुक्यातील चिरनेरच्या अक्काताई जंगलामध्ये झाला. २५ सप्टेंबरला ठाणे व रायगड जिल्ह्यातील ६ हजारपेक्षा जास्त आदिवासी नागरिकांनी चिरनेरमधील आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता. इंग्रजांचे आदेश झुगारून गाई - म्हशी जंगलामध्ये चरण्यासाठी घेवून जाण्याचा निर्धार केला. ‘जंगल आमच्या हक्काचे’ च्या घोषणा देण्यात आल्या. आंदोलन चिरडून काढण्यासाठी इंग्रजांनी गोळीबार करण्याचा आदेश दिला. या गोळीबारामध्ये आंदोलकांसह एकूण १३ जण हुतात्मा झाले. देशभर सुरू असलेल्या आंदोलनामध्ये चिरनेरमध्ये सर्वाधिक हुतात्मा झाले. या घटनेचे पडसाद पूर्ण देशभर उमटले. भूमिपुत्रांच्या पराक्रमाची दखल इतिहासाने घेतली. परंतु स्वातंत्र्यानंतर या हुतात्म्यांचे चांगले स्मारक उभारण्याची आवश्यकताही शासनाला वाटली नाही.चिरनेरमधील ऐतिहासिक लढ्याच्या स्मृती येथील ग्रामस्थांनी प्राणपणाने जपल्या आहेत. हुतात्म्यांचे स्मारक उभारले आहे. प्रत्येक हुतात्म्याची माहिती नागरिकांपर्यंत जावी, भावी पिढीला देशभक्तांच्या त्यागाची माहिती मिळावी यासाठी प्रयत्न केले आहेत. परंतु शासनाने मात्र अद्याप या स्मारकासाठी काहीही केलेले नाही. स्मारकाची देखभाल व साफसफाईही ग्रामपंचायतीच्यावतीने केली जात आहे. सरकारच्यावतीने २५ सप्टेंबरला हुतात्म्यांना मानवंदना दिली जाते, परंतु या व्यतिरिक्त दुसरे काहीही केले जात नाही. ज्या ठिकाणी प्रत्यक्ष गोळीबार झाला त्या अक्काताई जंगल परिसरातील घटनास्थळी साधा माहिती फलकही अद्याप लावलेला नाही. हुतात्म्यांची माहिती चिरनेर गावच्या बाहेरील नागरिकांना मिळेल अशी काहीही व्यवस्था अद्याप केलेली नाही. शासनाच्या संकेतस्थळांवरही याविषयी फारशी माहिती दिली जात नाही. अभ्यासक्रमामध्येही या घटनेविषयीचा उल्लेख अद्याप कधीच करण्यात आलेला नाही. उरण तालुका, रायगड जिल्हा व राज्यातील एकाही प्रकल्पाला, शहरातील चौकांना जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांचे नाव अद्याप दिलेले नाही. ही उपेक्षा कधी थांबणार, असा प्रश्न नागरिक उपस्थित करू लागले आहेत.हुतात्मा स्तंभचिरनेरमध्ये १३ हुतात्म्यांच्या स्मरणार्थ जानेवारी १९३२ मध्ये स्तंभ उभारला,परंतु इंग्रज सरकारने जूनमध्ये तो पाडला.पुढे जानेवारी १९३९ मध्ये नामदारबा. ग. खेर यांच्या उपस्थितीमध्ये स्मृतीस्तंभ पुन्हा उभारण्यात आला. ग्रामस्थांनी या स्तंभाची काळजी घेवून त्याची जपणूक केली आहे.छत्तीसगढ सरकारने जपला इतिहासदेशात जंगल सत्याग्रहाची सुरवात महाराष्ट्रातून झाली. सांगली, मराठवाडा व रायगड जिल्ह्यातील चिरनेरमध्ये तीव्र आंदोलने झाली. चिरनेरमध्ये १३ जण हुतात्मा झाले.महाराष्ट्रानंतर सर्वात मोठे आंदोलन छत्तीसगढमध्ये झाले. आपल्या सरकारने जंगल सत्याग्रहाच्या स्मृती जपल्या नसल्याने हा इतिहास नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.दुसरीकडे छत्तीसगढ सरकारने जंगल सत्याग्रहाच्या स्मृती जपल्या आहेत. या विषयावर अनेक पुस्तके लिहिण्यात आली आहेत. स्मारके उभारण्यात आली आहेत. महाराष्ट्रातील आंदोलनाचे संदर्भही तेथील साहित्यामध्ये आढळतात, परंतु महाराष्ट्र सरकार मात्र याविषयी फारसे काही करत नाही.हुतात्मा स्मारकाविषयी पुढील कामे करण्यात यावीतचिरनेरमध्ये भव्य राष्ट्रीय स्मारक उभारण्यात यावेजंगल आंदोलनाचा इतिहास पाठ्यपुस्तकातून शिकविण्यात यावाचिरनेरला पर्यटनस्थळ म्हणून घोषित करण्यात यावेजंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांची नावे नवी मुंबई, रायगडमधील मोठ्या प्रकल्पांना द्यावीहुतात्मा स्मारक परिसरातील तलावाचे सुशोभीकरणचिरनेर आंदोलनामधील हुतात्म्यांची नावेधाकू गवत्या फोबेरकर - चिरनेररघुनाथ मोरेश्वर न्हावी - कोप्रोलीरामा बामा कोळी - मोठी जुईआनंदा माया पाटील - धाकटी जुईपरशुराम रामा पाटील - पाणदिवेहसुराम बुध्या पाटील - खोपटेनाग्या महादू कातकरी - चिरनेरआलू बेमट्या म्हात्रे - दिघोडेनारायण पांडू कदम - पनवेलहरी नारायण तवटेजयराम बाबाजी सावंतकाशिनाथ जनार्दन शेवडेकेशव महादेव जोशी - मामलेदार