शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

वाघिवलीतील भूखंडवाटप प्रकरण : भूमिराज गृहप्रकल्प पुन्हा वादात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 02:28 IST

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी या प्रकरणी २0 मार्चपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश कोकण विभागीय आयुक्तांना दिले आहेत.

नवी मुंबई : वाघिवलीतील कुळाचे हक्क डावलून बेलापूरच्या पारसिक हिलवर साडेबारा टक्के योजनेअंतर्गत करण्यात आलेले भूखंडवाटप पुन्हा एकदा वादात सापडले आहे. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी या प्रकरणी २0 मार्चपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश कोकण विभागीय आयुक्तांना दिले आहेत. त्यामुळे सदर भूखंडावर उभारण्यात येत असलेल्या भूमिराज हिल्स या गृहप्रकल्पासमोर पुन्हा अडचणी निर्माण झाल्या आहेत.वाघिवली येथील मुंदडा कुटुंबाच्या मालकीच्या असलेल्या १२५ एकर जमिनीच्या संपादनापोटी सिडकोने २00८ मध्ये साडेबारा टक्के योजनेअंतर्गत बेलापूर येथील पारसिक हिलवर ५३ हजार २00 चौ.मी. भूखंडाचे वाटप केले आहे. सिडकोने वाटप केलेल्या या भूखंडाची बाजारभाव किंमत किमान ८00 कोटींच्या घरात आहे. मुंदडा नामक ज्या सावकाराकडून सिडकोने वाघिवलीची जमीन संपादित केली होती, ती जमीन भूसंपादनाच्या वेळेस त्या सावकाराच्या मालकीची नसून सरकारच्या मालकीची असल्याचे स्पष्ट झाले आहे. पनवेल विभागाचे उपविभागीय अधिकारी (प्रांत) यांनी या भूखंडवाटपासंदर्भात राज्यपालांकडून प्राप्त झालेल्या पारीवर केलेल्या चौकशी अहवालावरून ही बाब उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे पनवेल विभागाचे उपविभागीय अधिकारी (प्रांत) यांनी ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतरसुद्धा सदर सावकाराने लाटलेला भूखंड रद्द करण्यासाठी सिडकोस सूचित करण्याची तसदी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाने घेतली नाही.त्याबद्दल विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच या भूसंपादनाची सर्व कागदपत्रे आणि पनवेल प्रांताने दिलेल्या अहवालावर रायगडच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या कार्यवाहीची माहिती कोकण विभागीय आयुक्तांना सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यात पनवेलचे उपविभागीय अधिकाऱ्यांनी (प्रांत) ६ डिसेंबर २0१८ रोजी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर केलेल्या अहवालात अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाने आतापर्यंत काय कारवाई केली याचा अहवाल मागविला होता. मात्र यासंदर्भात कोकण विभागीय आयुक्तांनी सादर केलेल्या अहवालातून विचारलेल्या प्रश्नांवर भाष्यच करण्यात आले नाही.विधानसभा अध्यक्षांनी संताप व्यक्त करीत येत्या २0 मार्चपर्यंत पुन्हा सुधारित अहवाल पाठविण्याचे आदेश दिले आहेत.त्यामुळे संबंधित वादग्रस्त भूखंडावर जोमाने उभारण्यात येत असलेला भूमिराज हिल्स गृहप्रकल्प पुन्हा अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई