शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोच्या पुनर्वसन पॅकेजपासून वंचित; कुटुंबाचा आत्महत्येचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 00:48 IST

विमानतळबाधित वरचे ओवळे गावात मागील पंचवीस वर्षांपासून राहणाऱ्या एका बांधकामधारकाला पुनर्वसन पॅकेजपासून वंचित ठेवले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

नवी मुंबई : विमानतळबाधित वरचे ओवळे गावात मागील पंचवीस वर्षांपासून राहणाऱ्या एका बांधकामधारकाला पुनर्वसन पॅकेजपासून वंचित ठेवले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याविरोधात संबंधित कुटुंबाने आक्रमक पवित्रा घेतला असून न्याय न मिळाल्यास कुटुंबीयांसह आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.वरचे ओवळे गावात आरेनकेरी कुटुंबीय १९८५ पासून झोपडीवजा घरात राहत आहेत. वरचे ओवळे गाव विमानतळ बाधित क्षेत्रात आल्यानंतर सिडकोने सर्व्हे करून आरेनकेरी कुटुंब रहात असलेल्या झोपडीला ओव्ही-३९८ असा क्र मांक देखील दिला. त्यामुळे आरेनकेरी कुटुंबाला सिडकोकडून नुकसानभरपाई म्हणून पर्यायी घर मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु मूळ जमीन मालकाने संगनमत करून सिडकोकडून मिळणारे पुनर्वसन पॅकेज लाटल्याचा आरोप आरेनकेरी कुटुंबीयांनी केला आहे.पुनर्वसन योजनेचा लाभ घेणाºया प्रकल्पग्रस्तांना विमानतळबाधित गावे रिकामी करावी लागणार आहेत. त्यामुळे आम्ही रहात असलेल्या घरातून जबरदस्तीने हुसकावून लावण्याचे प्रयत्न केले जात आहे. त्यासाठी धमकावले जात आहे. आम्ही पंचवीस वर्षांपासून येते राहत आहोत. त्यामुळे सिडकोने आम्हालाही नियमानुसार पुनर्वसन पॅकेज द्यावे, अन्यथा सामूहिक आत्महत्या करू, असा इशारा या कुटुंबीयांनी पोलीस व सिडको प्रशासनाला दिलेल्या पत्राद्वारे दिला आहे.

टॅग्स :AirportविमानतळNavi Mumbaiनवी मुंबई