शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
2
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
5
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
6
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
7
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
8
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
9
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
10
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
11
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
12
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
13
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
14
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
15
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
16
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
17
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
18
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
19
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
20
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही

कलगुटकरांची सभा विनापरवानगी

By admin | Updated: August 30, 2016 02:57 IST

जमिनीचे रिलायन्स गॅस पाइपलाइनकरिता भू-संपादन करण्यासाठी शेतकऱ्यांची बैठक उपजिल्हाधिकारी अभय करगुटकर यांनी बोलाविली होती

कर्जत : येथील जमिनीचे रिलायन्स गॅस पाइपलाइनकरिता भू-संपादन करण्यासाठी शेतकऱ्यांची बैठक उपजिल्हाधिकारी अभय करगुटकर यांनी बोलाविली होती. कर्जत तहसील कार्यालयाच्या आवारातील सभागृहात झालेली ती वादळी बैठक उपजिल्हाधिकारी करगुटकर यांनी आपल्या मर्जीने कोणत्याही परवानगी विना घेतली होती हे २९ आॅगस्ट रोजी सिद्ध झाले. ८ आॅगस्टचे परवानगी मिळावी म्हणून पत्र घेऊन आलेल्या रिलायन्स गॅस पाइपलाइनच्या अधिकाऱ्यांनी तशी कबुली कर्जत पोलीस ठाण्यात दिली आहे.रिलायन्स गॅस पाइपलाइनसाठी जमीन द्यावयाची नाही असे लेखी पत्र कर्जतचे आमदार लाड यांनी दिले. असे असताना आणि या गॅस पाइपलाइनला कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांचा विरोध झुगारून रिलायन्स गॅस पाइपलाइनसाठी शासनाने नेमलेले प्राधिकृत प्राधिकारी, पालघर येथील उपजिल्हाधिकारी अभय करगुटकर यांनी ११ आॅगस्ट रोजी कर्जत तहसील कार्यालयाच्या आवारात शेतकऱ्यांची बैठक घेतली. तेथे कर्जतचे आमदार आणि २००७ मध्ये गॅस पाइपलाइनमुळे बाधित झालेले शेतकऱ्यांची आ. सुरेश लाड यांनी भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला. तेथे अभय करगुटकर मारहाण प्रकरण घडले. आ. सुरेश लाड यांच्यावर कर्जत पोलीस ठाण्यात मारहाण केल्याचा गुन्हा १७ आॅगस्ट रोजी दाखल झाला होता. २४ आॅगस्ट रोजी कर्जत पोलिसांनी आमदार लाड यांना अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली. आमदार लाड हे शेतकऱ्यांसाठी त्या सभेला गेले होते आणि शेतकऱ्यांची बाजू मांडत असताना मारहाण करण्याची वेळ आली, हे अनेक शेतकऱ्यांनी पाहिल्याने लाड यांना रिलायन्स गॅस पाइपलाइन कंपनी विरु द्ध पुकारलेल्या लढ्याला उदंड प्रतिसाद मिळाला आहे. त्या पार्श्वभूमीवर रिलायन्स गॅस पाइपलाइनसाठी भूसंपादनाची जबाबदारी असलेले उपजिल्हाधिकारी अभय करगुटकर यांनी २९ आॅगस्ट रोजी कंपनीचे अधिकारी शिरीष पोटे (५९ ) यांना आपल्या ठाणे येथील कार्यालयातून पत्र घेऊन कर्जत तहसील कार्यालयात पाठविले. शिरीष पोटे यांनी सोमवारी २९ आॅगस्ट रोजी दुपारी १ वाजता कर्जत तहसील कार्यलयाच्या नोंदणी शाखेत ११ आणि १२ आॅगस्ट २०१६ रोजी झालेल्या शेतकऱ्यांच्या सभेला कर्जत तहसील कार्यालयाने परवानगी द्यावी असे पत्र नोंद करण्याचा आग्रह केला. तहसीलमधील कर्मचाऱ्याने २९ आॅगस्टला तुमचे ८ आॅगस्टचे पत्र आज आवक होऊ शकत नाही असे सांगून नकार दिला. ही माहिती माजी नगराध्यक्ष राजेश लाड यांना समजली. त्यांनी नगरसेवक सोमनाथ ठोंबरे आणि ५ते ७ शेतकरी यांच्यासह कर्जत तहसील कार्यालय गाठले. तेथे रिलायन्स गॅस पाइपलाइन कंपनीकडून प्राधिकृत सक्षम प्राधिकारी अभय करगुटकर यांचे पत्र घेऊन आलेले निवृत्त अधिकारी आणि कंपनीचे अधिकारी शिरीष पोटे त्यांच्या सोबत असलेले मोरे यांना तुम्ही पोलीस ठाण्यात चला असे सूचित केले. दोन्ही अधिकारी कर्जत पोलीस ठाण्यात आले, तेथे माजी नगराध्यक्ष राजेश लाड, शरद लाड आणि अनेक शेतकऱ्यांनी कर्जत पोलीस ठाण्याचे निरीक्षक अजनुद्दीन मुल्ला यांना हकिकत सांगितली.त्यानंतर पोलिसांनी रिलायन्स गॅस पाइपलाइनचे अधिकारी शिरीष पोटे यांचा जबाब नोंदवून घेतला. त्यांनी ११ आणि १२ आॅगस्ट रोजी शेतकऱ्यांची सभा घेण्यासाठी कर्जत तहसील कार्यालयातील सभागृह मिळावे यासाठी ८ आॅगस्टचा अर्ज घेऊन आलो असे नमूद केले. उपजिल्हाधिकारी करगुटकर यांच्या सहीचे मागील तारखेचे पत्र मारहाण प्रकरण झाल्यानंतर नोंदणी शाखेत जमा करण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे गॅस पाइपलाइनसाठी ११ आॅगस्टला कर्जत तहसील कार्यालयाच्या आवारात घेतलेली शेतकऱ्यांची बैठक विना परवानगी घेतली असल्याचे सिद्ध झाले आहे.