शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

कोकण आयुक्तांनी घेतला महसूल विभागाचा आढावा

By कमलाकर कांबळे | Updated: July 11, 2023 18:44 IST

नवी मुंबई : कोकण विभागातील महसूल विभागाच्या प्रलंबित कामांना जिल्हाधिकारी यांनी गती दयावी.  राज्यात कोकण विभागाचे काम अव्वल करावे, ...

नवी मुंबई : कोकण विभागातील महसूल विभागाच्या प्रलंबित कामांना जिल्हाधिकारी यांनी गती दयावी.  राज्यात कोकण विभागाचे काम अव्वल करावे, अशा सूचना महसूल आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी दिल्या.

आज विभागीय आयुक्त कार्यालयात डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली कोकण विभागातील जिल्हाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस उपायुक्त (महसूल) मकरंद देशमुख, उपायुक्त (सामान्य) मनोज रानडे, मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, पालघर जिल्हाधिकारी गोविंद बोडके, रायगड जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, रत्नागिरी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह आणि सिंधुर्दूग जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी आदी उपस्थित‍ होते.

या बैठकीत ऑनलाईन सातबारा, फेरफार नोंदणी, भूसंपादन, कांदळवन प्रकरण, शासन आपल्या दारी, नवीन वाळूधोरण, महाराजस्व अभियान, सलोखा योजना, मुख्यमंत्री सौरऊर्जा प्रकल्पासाठी जमीन, गावठाण संबंधित प्रश्न, ई-पिक पाहणी, ई-चावडी, ई-रेकॉर्ड, ई-मोजणी, प्रगती पोर्टल, पीजी पोर्टल, शहराच्या हद्दीतील सातबारे बंद करणे, पुरवठा शाखेतील विविध विषय, भूसंपादनातील प्रलंबित प्रश्न या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. दिव्यांगांच्या दारी शासन योजना

महाराष्ट्राच्या दिव्यांग विभागाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू, यांच्या सूचनेनुसार कोकण विभागातील सर्व जिल्हयांमध्ये दिव्यांगांचे प्रश्न सोडविण्यासाठी “दिव्यांगांच्या दारी शासन” हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.  प्रत्येक तालुका पातळीवर नोंदणीकृत दिव्यांगांना शासनाचा लाभ कसा देता येईल. या बाबत महसूल यंत्रणांनी काम करावे,अशा सूचना यावेळी  देण्यात आल्या.  सर्व सामान्यांच्या प्रश्नाप्रमाणेच दिव्यांगांचे प्रश्नही महत्वाचे आहेत. ते अधिकाऱ्यांनी संवेदनशील प्रकारे हाताळण्याची आवश्यकता असल्याचे महसूल आयुक्तांनी  यावेळी सांगितले.