शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

ध्वनिप्रदूषणाच्या विळख्यात पनवेलकर

By admin | Updated: February 9, 2016 02:29 IST

मुंबई, नवी मुंबईप्रमाणे पनवेल परिसरालाही ध्वनिप्रदूषणाचा विळखा पडला आहे. वाहनांची वाढती संख्या, गरज नसताना वाजविण्यात येणारे हॉर्न यामुळे आवाजाची पातळी रात्री ४५ ते

- नामदेव मोरे,  नवी मुंबई मुंबई, नवी मुंबईप्रमाणे पनवेल परिसरालाही ध्वनिप्रदूषणाचा विळखा पडला आहे. वाहनांची वाढती संख्या, गरज नसताना वाजविण्यात येणारे हॉर्न यामुळे आवाजाची पातळी रात्री ४५ ते ५८ व दिवसा ६० ते ७१ डेसिबलपर्यंत जात आहे. दिवस-रात्र सुरू असलेल्या गोंगाटामुळे शहरवासीयांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ध्वनिप्रदूषण ही देशातील सर्वच शहरांमधील गंभीर समस्या झाली आहे. वाहनांची वाढती संख्या, उत्सवांमधील डीजेसह मोठ्या आवाजातील साऊंड सिस्टीम, अनावश्यकपणे वाजविण्यात येणारे हॉर्न यामुळे मर्यादेपेक्षा जास्त गोंगाट दिवस-रात्र सुरू असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. या गोंगाटामधून पनवेलही सुटलेले नाही. पनवेल एस. टी. स्टँड परिसरात नियमित वाहनांची गर्दी असते. याठिकाणी वाहतूक नियमांचे योग्य पालन न केल्यामुळे वारंवार वाहतूक कोंडी होत असते. चक्का जाम झाल्यानंतर प्रत्येक वाहनचालक विनाकारण हॉर्न वाजवत असल्याने प्रवाशांना कानठळ्या बसत आहेत. उरण नाका, मच्छी मार्केट, पटेल मोहल्ला, शिवाजी चौक व इतर सर्वच महत्त्वाच्या ठिकाणी हीच स्थिती आहे. पनवेलमध्ये पूर्णपणे व्यावसायिक नोड नाही. निवासी व वाणिज्य अशी संमिश्र रचना सर्वच ठिकाणी आहे. वास्तविक या सर्व ठिकाणी रात्री ४५ व दिवसा ५५ डेसिबल एवढा आवाज असणे आवश्यक आहे. परंतु अनेक ठिकाणी आवाजाची पातळी रात्री ४५ ते ५८ पर्यंत जावू लागली आहे. दिवसा अनेक ठिकाणी ६० ते ७१ डेसिबलपर्यंत आवाजाची मर्यादा जात आहे. वाहन चालक आवश्यकता नसतानाही वारंवार हॉर्न वाजवत असल्याने ध्वनिप्रदूषणाची समस्या गंभीर होत आहे. याशिवाय लग्न, उत्सव व इतर सार्वजनिक कार्यक्रमांच्या दरम्यान साऊंड सिस्टीमचा आवाज वाढविला जात आहे. पनवेल एस. टी. स्टँड परिसरात हॉस्पिटलही आहेत. इतरही काही ठिकाणी हॉस्पिटल असणाऱ्या ठिकाणी वाहनांचा गोंगाट वाढत असून त्यामुळे रुग्णांना त्रास होत आहे. पनवेलमध्ये शाळा, मंदिर, रुग्णालय परिसरामध्ये शांतता क्षेत्राचे फलक लावणे आवश्यक आहे. परंतु अनेक ठिकाणी नो हॉर्नचे फलक लावलेले नाहीत. यामुळे शांतता क्षेत्र असणाऱ्या ठिकाणीही बिनधास्तपणे वाहनचालक हॉर्न वाजवत असतात. ध्वनिप्रदूषणाचा गंभीर परिणाम आरोग्यावर होवू लागला आहे. जादा आवाजामुळे बहिरेपणा येतोच याशिवाय नागरिकांमधील चिडचिडेपणा वाढतो. वारंवार डोके दुखणे व इतर आजारांनाही सामोरे जावे लागते. नो हॉर्न चळवळीची गरजशहरवासीयांना ध्वनिप्रदूषणाच्या विळख्यातून सोडविण्यासाठी नो हॉर्न चळवळ राबविण्याची गरज आहे. सिग्नल सुरू असताना, ट्रॅफिक जाम झालेले असताना विनाकारण हॉर्न वाजवू नये, अशी स्वयंशिस्त प्रत्येक चालकाने पाळली पाहिजे. शाळा, रुग्णालय परिसरामधून जातानाही हॉर्न वाजविणे बंद केले पाहिजे. फक्त वाहतूक पोलीस ध्वनिप्रदूषण थांबवू शकत नाहीत. शहरवासीयांनी स्वयंस्फूर्तपणे नो हॉर्न प्लीज ही मोहीम राबविण्याची वेळ आली आहे. शांतता क्षेत्रे घोषित करावीशहरात शिक्षण संस्था, रुग्णालय, वृद्धाश्रम व इतर महत्त्वाच्या ठिकाणी शांतता क्षेत्रे घोषित करून, तसे बोर्ड वाहनधारकांना दिसतील अशापद्धतीने लावले पाहिजेत. शाळेच्या बाहेर मुलांना सोडण्यासाठी व पुन्हा घरी घेऊन जाण्यासाठी येणाऱ्या पालकांनी व स्कूलबसचालकांनीही हॉर्न वाजविणे थांबविले पाहिजे. शांतता क्षेत्रात गोंगाट करणाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे. पनवेलमध्ये वाहनचालक वाहतुकीच्या नियमांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. सिग्नल, वाहतूककोंडी झाल्यानंतर मोठ्याने हॉर्न वाजविले जात आहेत. वाहने रोडवर उभी केल्यामुळेही वाहतुकीला अडथळा निर्माण होतो व पुन्हा हॉर्नचा गोंगाट सुरू होतो. याशिवाय उत्सव काळातही ध्वनिक्षेपकाचा आवाज जास्त असून, प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वांनी स्वयंशिस्त पाळणे महत्त्वाचे आहे. - अरुण भिसे, पोलीस निरीक्षक, पनवेल वाहतूक विभाग