शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमधील बालवाड्या बंद होऊ देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 02:46 IST

पनवेल : महानगरपालिका हद्दीत भरविण्यात येणाºया बालवाड्या बंद करण्याचे आदेश महापालिका प्रशासनाने दिले आहेत.

पनवेल : महानगरपालिका हद्दीत भरविण्यात येणाºया बालवाड्या बंद करण्याचे आदेश महापालिका प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे बालवाडीत शिकविणाºया ५३ कर्मचाºयांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पालिका प्रशासनाच्या या निर्णयाच्या विरोधात बंड पुकारत महिला व बालकल्याण समिती सभापती दर्शना भोईर यांनी बालवाड्या बंद होऊ देणार नाही, असा निर्धार केला आहे. त्यामुळे बालवाड्या महिला व बालकल्याण विभागाकडे सुपूर्द कराव्यात, अशी मागणीही भोईर यांनी केली आहे.१९९८पासून पनवेल नगरपरिषद हद्दीमध्ये परिषदेच्या ३३ बालवाड्या कार्यरत आहेत. १ आॅक्टोबर २०१६ला महापालिका झाल्यानंतर या बालवाड्या महापालिका कार्यक्षेत्रात समाविष्ट झाल्या. सध्या या ३३ बालवाड्यांमध्ये पनवेल शहरातील ६१० मुले पूर्वप्राथमिक शिक्षण घेत आहेत. तसेच यासाठी ३३ शिक्षिका व २० मदतनीस काम करीत आहेत. नगरपरिषदेच्या बालवाड्या असल्याने परिषदेतर्फे त्यांचे वेतन दिले जात होते. मात्र, पालिका अस्तित्वात आल्यानंतर या कर्मचाºयांना वेतन देण्यासाठी पुरेसे पैसे नसल्याचे कारण देत महापालिका प्रशासनाने जून २०१७पासून या बालवाड्या बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. जूनपासून आजतागायत बालवाडी कर्मचाºयांना वेतन देण्यात आलेले नाही. मुलांना लागणारा खाऊसुद्धा हे कर्मचारी स्वत: पैसे काढून पुरवीत असल्याचे निदर्शनास आले आहे. याशिवाय ज्या पालिका शाळांमध्ये या बालवाड्या भरविल्या जातात त्यांना आता वर्ग खाली करण्याचे आदेश शिक्षण विभागातर्फे देण्यात आले आहेत.यासंदर्भात महिला व बालकल्याण सभापती दर्शना भोईर यांनी जून २०१७मध्ये बालवाड्या पूर्ववत सुरू ठेवण्याची विनंती प्रशासन अधिकाºयांना केली होती. मात्र, अजूनपर्यंत त्यावर कोणताही तोडगा काढण्यात आलेला नाही. सर्व बालवाड्या एकात्मिक बालविकास योजनेकडे हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव दर्शना भोईर यांनी मांडला आहे.>लोकप्रतिनिधींनी केलेल्या मागणीची दखल घेण्यासाठी अधिकाºयांना वेळ नसल्याचा आरोप करीत प्रशासन जर लोकप्रतिनिधींची अवहेलना करीत असेल, तर खपवून घेतले जाणार नाही.- दर्शना भोईर, सभापती,महिला व बाल कल्याण विभाग