शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

खतकुंड्या बनल्या कचराकुंड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 01:57 IST

पनवेल महानगरपालिकेने स्वच्छता सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी खतकुंड्या उभारल्या होत्या

- अरुणकुमार मेहत्रे कळंबोली : पनवेल महानगरपालिकेने स्वच्छता सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी खतकुंड्या उभारल्या होत्या; परंतु आता या खतकुंड्यांचे रूपांतर कचराकुंड्यांत झाल्याचे दिसून आले आहे. खतनिर्मितीच्या हेतूने निर्माण करण्यात आलेल्या कुंड्यांत आता कचरा साठविला जात असल्याने महापालिकेचे लाखो रुपये पाण्यात गेल्याची चर्चा पनवेलमध्ये सुरू आहे.पनवेल महानगरपालिकेने महत्त्वाच्या ठिकाणी खतकुंड्या बांधल्या आहेत, त्यामध्ये पनवेल शहर, छोटा आणि मोठा खांदा, कळंबोली, कामोठे तसेच काही समाविष्ट गावांमध्ये ५० पेक्षा जास्त खतकुंड्या बांधण्यात आल्या आहेत. आणखी काही ठिकाणी त्या बांधण्यात येणार आहेत. प्री कास्ट पॅनेलच्या माध्यमातून या कंपोस्टिंग बिन्स तयार करण्यात आल्या आहेत. या पाठीमागे ओला कचरा त्याचबरोबर पालापाचोळ्यावर कंपोस्ट खतनिर्मितीचा संकल्प करण्यात आला होता, यातून निर्माण होणाऱ्या खताचा वापर उद्यान, गार्डन तसेच झाडांसाठी करण्यात येणार होता. त्याचबरोबर जास्त खत निर्माण झाले तर त्याची विक्र ी करून उत्पन्न मिळविण्याचे ध्येय होते.मात्र, पनवेल शहरात तसेच महापालिका हद्दीत फेरफटका मारला तर या प्री कास्ट कंपोस्टिंग बिन्समध्ये कचरा टाकला जात असल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे, शेजारच्या भिंतीवर कचरा घंटागाडीतच टाका, इतरत्र टाकल्यास १५० रुपये दंड आकारला जाईल, असा संदेश लिहिण्यात आला आहे.>आपल्या परिसराची स्वच्छता राखणे हे नागरिकांचे कर्तव्य आहे. त्यासाठी प्रशासनाने खतकुंड्या तयार केल्या आहेत. यात ओला आणि सुका कचरा वेगळा करून टाकणे अपेक्षित आहे; परंतु खतकुंड्यात प्लॅस्टिक, टायर अशा प्रकारे सुका कचरा टाकला जातो. त्यासाठी जनजागृतीची गरज असून यासंदर्भात महापालिकेच्या वतीने लवकरच उपाययोजना करण्यात येतील.- डॉ. अरु णकुमार भगत, आरोग्य सभापती>सहायक आयुक्त अनभिज्ञघनकचरा व्यवस्थापनाची जबाबदारी सहायक आयुक्त श्याम पोशेट्टी यांच्यावर देण्यात आली आहे. महापालिकेने किती खतकुंड्या बांधल्या, त्यातून किती कंपोस्ट खत तयार झाले, याबाबत पोशेट्टी यांना विचारले असता, याबाबत आपल्याला काहीच माहीत नसल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.स्वच्छ सर्वेक्षणाकरिता या खतकुंड्या बांधून सेल्फीगिरी करण्यात आली, पुढे त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. कचराकुंड्या तर सोडाच; पण इतर प्रकल्पसुद्धा बंद पडायला लागले आहेत, याला सत्ताधारी आणि प्रशासन जबाबदार आहे. - अरविंद म्हात्रे, नगरसेवक