शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘रन फॉर कॅशलेस’साठी धावले खारघरवासी

By admin | Updated: January 23, 2017 05:54 IST

खारघर मॅरेथॉन कमिटी आणि रामशेठ ठाकूर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रन टू प्रमोट कॅशलेस ट्रान्झॅक्शन’

पनवेल : खारघर मॅरेथॉन कमिटी आणि रामशेठ ठाकूर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रन टू प्रमोट कॅशलेस ट्रान्झॅक्शन’ हे घोषवाक्य घेऊन रविवारी खारघर मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या राज्यस्तरीय स्पर्धेत हजारोंच्या संख्येत महाराष्ट्रातील खेळाडूंनी उपस्थिती लावली. स्पर्धेत पुरुषांच्या खुल्या गटात बीडच्या अविनाश साळवे तर महिलांच्या गटात वेस्टर्न रेल्वेच्या किरण सरेदार यांनी बाजी मारत अव्वल क्रमांक पटकावला.रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मॅरेथॉनला प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध नर्तिका सिनेअभिनेत्री सुधा चंद्रन उपस्थित होत्या. आर जे अर्चना आणि सलील यांनी हिरवा झेंडा दाखवून मॅरेथॉनला सुरु वात केली. स्पर्धेत जिल्हास्तरीय पुरुष गटात सुजित गमर याने तर महिला गटात सोनिया मोकल हिने प्रथम क्र मांक पटकावला. खारघर सेक्टर १९ येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल येथून सकाळी ७ वाजता स्पर्धा सुरु झाली. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, मॅरेथॉन कमिटीचे प्रमुख संयोजक परेश ठाकूर यांच्या नियोजनामुळे स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छेडलेल्या रोकडरहित व्यवहाराला चालना देण्यासाठी रन फॉर कॅशलेस हे मॅरेथॉनचे ब्रीदवाक्य होते. बक्षीस वितरण समारंभाला उपस्थितीमध्ये सिनेकलाकार सिकंदर खान, आर्यन वैद्य, हिरानंदनीचे सीईओ निकेश शेट्टी, रोमल शर्मा, वाय. टी. देशमुख, अरु ण भगत, ज्ञानेश्वर तिडके, सिडकोचे खारघर प्रशासक सीताराम रोकडे, जयंत पगडे, रत्नप्रभा घरत, संजय पाटील, चारु शीला घरत, भाजप खारघर शहर प्रमुख ब्रिजेश पटेल, अनंता तोडेकर, अभिमन्यू पाटील, लीना गरड, प्रभाकर जोशी, किरण पाटील, दीपक शिंदे, बिना गोगरी आदींसह मोठ्या संख्येने स्पर्धक, खारघरमधील रिहवासी व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)