शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

खारघर - पनवेल एनएमएमटी सुरू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 02:35 IST

खारघर ते पनवेल या मार्गावर एनएमएमटी बससेवा सुरू करावी, अशी मागणी नगरसेविका संजना समीर कदम यांनी नवी मुंबई महापालिका परिवहन व्यवस्थापकांकडे पत्राद्वारे केली आहे.

पनवेल : खारघर ते पनवेल या मार्गावर एनएमएमटी बससेवा सुरू करावी, अशी मागणी नगरसेविका संजना समीर कदम यांनी नवी मुंबई महापालिका परिवहन व्यवस्थापकांकडे पत्राद्वारे केली आहे.तीन लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या खारघर शहरात जवळपास ४0 सेक्टर आहेत. नागरिकांना विविध कामांसाठी पनवेल तहसील, प्रांत, पंचायत समिती आणि पनवेल पालिकेच्या मुख्यालयात नेहमीच जावे लागतात.जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठेत येथील बाजारपेठेचा उल्लेख आजही होतो. शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना रहिवासी, जातीचा आणि उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी पनवेल तहसील कार्यालयात जावे लागते. याशिवाय खारघर सेक्टर २५ ते ४0 परिसरातील नागरिकांना कोपरा अथवा हिरानंदानी बस थांब्यावर जाण्यासाठी ५0 ते १00 रु पये रिक्षासाठी खर्च करावे लागतात. त्यामुळे शालेय विद्यार्थी आणि नागरिकांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो.नवी मुंबई महानगरपालिका परिवहन विभागाने रॅपिड अ‍ॅक्शनफोर्स, सेक्टर ३४, रामशेठ ठाकूर कॉलेज, रांजणपाडा, वास्तुविहार, घरकूल, डेली बाजार आणि शिल्प चौक व हिरानंदानी मार्गे पनवेल या मार्गावर बससेवा सुरू केल्यास नागरिकांची चांगली सोय होईल आणि परिवहनच्या उत्पन्नातहीवाढ होईल. परिवहन विभागाने तातडीने सर्वेक्षण करून बससेवा सुरू करावी, अशी मागणी कदम यांनी केली आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई