शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
2
राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली
3
"भाजपाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांचाही विश्वासघात करेल"; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुळीक यांचे टीकास्त्र
4
Battle Of Galwan Teaser: मौत से क्या डरना...! 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर, 'या' दिवशी सिनेमा रिलीज होणार
5
जिवलग जीवाचा... विराट कोहली!! स्वत:चीच विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला दिलं एकदम खास 'गिफ्ट'
6
सोन्या-चांदीची भरारी, विदेशींची माघार अन् भारतीयांचा एल्गार! हे वर्ष कोणासाठी ठरलं फायद्याचं
7
जिममध्ये जाणाऱ्यांनो सावधान! १९ वर्षीय विद्यार्थ्याचा प्रोटीन शेक प्यायल्याने मृत्यू; नेमकं काय घडलं?
8
प्रशासनाचा गलथान कारभार! निवडणूक एका ठिकाणी, अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली दुसरीकडे; उमेदवाराच्या विजयानंतर शासनाला आली जाग
9
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
10
TATA Steel विरोधात खटला दाखल; १४८ अब्ज रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी, प्रकरण काय?
11
IT Manager Gang Rape: हॉटेलमध्ये आले, दीड वाजेपर्यंत पार्टी आणि गुप्तांगावर जखमा; मॅनेजर सामूहिक बलात्कार प्रकरणाची Inside Story
12
Ashes मध्ये तुफान राडा! जो रूटने मार्नस लाबुशेनचा कॅच घेण्यावरून मैदानात गोंधळ, पाहा VIDEO
13
क्रूरतेचा कळस! जावई झाला हैवान; सासू-सासरे आणि बायकोवर तलवारीने केले सपासप वार
14
एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट
15
VIDEO: डिटर्जंट, युरिया अन् रिफाईंड तेल; अंधेरीत नामांकित ब्रँड्सच्या पिशव्यांमध्ये भरलं भेसळयुक्त दूध, घरात सुरु होतं रॅकेट
16
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
17
दोन वर्षांत २९००० डॉक्टर, अभियंते, अकाउंटंट्सनी पाकिस्तान सोडले, जगभरात आसिम मुनीर यांची नामुष्की
18
PMC Elections : दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटली;शरद पवार गटाची काँग्रेस, उद्ववसेनेशी चर्चा सुरू
19
बॉक्सिंग डे कसोटीतील विजयासह इंग्लंडनं साधला मोठा डाव; ऑस्ट्रेलियाला धक्का देत टीम इंडियाशी बरोबरी
20
प्रेयसीच्या नादात हिमांशू भारद्वाजने आधी विकली स्वतःची किडनी, नंतर रॅकेटमध्ये झाला सामील
Daily Top 2Weekly Top 5

खारघर कार्पोरेट पार्कची रखडपट्टी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 23:18 IST

सिडकोचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प : करार लांबणीवर

नवी मुंबई : मुंबईतील बीकेसीच्या धर्तीवर खारघर येथे अत्याधुनिक दर्जाचे कार्पोरेट पार्क (केसीपी) उभारण्याच्या दृष्टीने सिडकोने कार्यवाही सुरू केली आहे. या पार्कचा आराखडा तयार करण्यासाठी सिंगापूरच्या इकॉनिमिक्स डेव्हलपमेंट बोर्ड (ईडीबी) या शासकीय कंपनीची नियुक्ती करण्याचे निश्चित झाले होते; परंतु वर्ष उलटले तरी संबंधित कंपनीबरोबर सामंजस्य करारच झाला नसल्याने खारघर कार्पोरेट पार्कचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबई परिसरात मोठमोठे आंतरराष्ट्रीय प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. यात प्रामुख्याने यात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, नैना प्रकल्प, जेएनपीटी, प्रस्तावित शिवडी सी लिंक, मेट्रो या प्रकल्पांचा समावेश आहे. खारघर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे गोल्फ कोर्स उभारण्यात आले. या सर्व प्रकल्पांमुळे नवी मुंबईकडे एक नवे आर्थिक केंद्र म्हणून पाहिले जाते. या पार्श्वभूमीवर बीकेसीच्या धर्तीवर नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय वाणिज्य संकुल उभारण्याची गरज निर्माण झाली आहे. खारघर येथील सेंट्रल पार्कच्या बाजूला १२० हेक्टर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे कार्पोरेट पार्क उभारण्याचा निर्णय जानेवारी २०१६ मध्ये घेण्यात आला.

जानेवारी २०१७ मध्ये या प्रकल्पाचा विकास आराखडा तयार करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा घेण्यात आली होती. त्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील एकूण २४ वास्तुविशारदांना भाग घेतला होता. त्यांना विकास आराखड्याच्या संकल्पना सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. स्पर्धात्मक प्रक्रियेतून प्राप्त झालेल्या सात कंपन्यांच्या विकास आराखड्यांची सिडकोने निवड केली होती. निवड झालेल्या या सात वास्तुविशारदांना आपले अंतिम आरखडे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार प्राप्त झालेल्या सातपैकी एका उत्कृष्ट वास्तुविशारद व सल्लागार कंपनीची निवड करण्यासाठी सिडकोने पाच तज्ज्ञांची एक समिती गठीत केली होती. या समितीने सिंगापूरच्या ईडीबी डिझायनर या कंपनीच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे. त्यानंतर लगेच संबंधित कंपनीबरोबर सामंजस्य करार करणे अपेक्षित होते. मात्र, वर्ष उलटले तरी करार न झाल्याने महत्त्वाकांक्षी खारघर पार्कचा आराखडा तयार करण्याचे काम रखडल्याची माहिती सूत्राने दिली. यासंदर्भात सिडकोचे अतिरिक्त मुख्य अभियंता एस. के. चौटालिया यांच्याशी संपर्क साधला असता करारासंदर्भातील प्रक्रिया सुरू आहे. मात्र, याबाबत नियोजन विभागाकडून सविस्तर माहिती उपलब्ध होईल, असे स्पष्ट केले. नियोजन विभागाचे मुख्य नियोजनकार किरण डेंगळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.सिडकोने स्पर्धात्मक प्रक्रियेतून मागविलेल्या प्रस्तावाला सिंगापूर, नेदरलँड, अमेरिका, इंग्लड, फ्रान्समधील वास्तुविशारद कंपन्यांनी प्रतिसाद दिला होता, तर नवी दिल्ली, मुंबई व बंगळुरूमधील काही वास्तुविशारदांनी परदेशी कंपन्याबरोबर सामंजस्य करार करून आपले आरखडे सादर केले होते. या स्पर्धात्मक प्रक्रियेत १४ अंतरराष्ट्रीय तर १३ राष्ट्रीय स्तरावरील कंपन्यांनी भाग घेतला होता. या सर्वांना मागे टाकत या सिंगापूरच्या ईडीबी या शासकीय कंपनीने बाजी मारली; परंतु या कंपनीबरोबरच अद्यापि सामंजस्य करार न झाल्याने खारघर कार्पोरेट पार्क रखडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

केसीपीची वैशिष्ट्यच्पाच वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचे सिडकोचे उद्दिष्टच्बहुतांशी इमारती पिरॅमिडच्या आकारात बांधण्याची संकल्पनाच्परदेशातील नाइट लाइफच्या धर्तीवर दुकाने व व्यावसायिक गाळ्यांची रचनाच्नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून १२.५ किलोमीटरचे अंतरच्खारघर रेल्वे स्थानकापासून केवळ ५ कि.मी.चे अंतरच्मेट्रो स्थानकापासून हाकेच्या अंतरावरच्सायन-पनवेल महामार्गापासून १.५ कि.मी. अंतर