शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाच्या फुसक्या धमक्यांचे 'बार' सोडणाऱ्या बिलावल भुट्टोंचं 'भिरभिरं' जमिनीवर; म्हणाले, 'भारतासोबत...'
2
कॅप्टन्सीत शतकी 'रोमान्स'! शुबमन गिलनं मारली विराटसह या दिग्गजांच्या क्लबमध्ये एन्ट्री
3
कर्नाटकात मुख्यमंत्री पदावरून अंतर्गत कलह सुरू असतानाच सरकारचा मोठा निर्णय; २ शहरांची नावं बदलली
4
"...तर काँग्रेस पक्षाला थेट आरोपी बनवता येईल"; नॅशनल हेराल्ड प्रकरणात EDचा न्यायालयात दावा
5
IND vs ENG: बुमराहवर प्रचंड संतापले रवी शास्त्री; गंभीर-गिल जोडीला म्हणाले- "त्याच्या हातातून..."
6
"एकदा तरी मला माझ्या बहिणीला भेटू द्या"; सोनम रघुवंशीच्या भावाची मागणी, म्हणाला... 
7
यशस्वी जैस्वालची सेंच्युरी हुकली! पण एका डावात अनेक विक्रम; हिटमॅन रोहित शर्मालाही टाकले मागे
8
खतरनाक इनस्विंग! स्टायलिश अंदाजात बॉल सोडला अन् 'क्लीन बोल्ड' होऊन तंबूत परतला (VIDEO)
9
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मोठा धक्का, सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा!
10
८ वर्षांनी संधी; आता प्रमोशनही मिळालं! पण तो पुन्हा 'बिनकामाचा' ठरला
11
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
12
कठड्यावर धडकून बाईकखाली पाय अडकला अन...; दुचाकी पेटल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
13
टॉयलेटमध्ये जाणाऱ्या महिलांचे बनवत होता व्हिडीओ; प्रसिद्ध आयटी कंपनीमधील इंजिनियरला अटक
14
आधार कार्ड दिलं नाही म्हणून काढली पँट; कावड यात्रेआधी ओळख पटवणाऱ्या लोकांवर भडकले ओवैसी
15
इन्स्टाग्रामवर सूत जुळलं, कोर्ट मॅरेजनंतर मुलाला दिला जन्म; २२ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य
16
सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारे भारतीय कर्णधार, धोनी दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
17
"लग्न करुन येऊ? घर देणार का मग?", अ‍ॅक्टर असल्यामुळे मिळत नाहीये घर, पूजा कार्तुडे संतापली!
18
...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार!
19
२०२७ पर्यंत ३ राशींना साडेसाती कायम, २ राशींवर शनि दृष्टी; अशुभ प्रभाव वाढेल? ‘हे’ उपाय कराच
20
“उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चा एक हिस्सा काढून राज ठाकरेंना देणार का?”; नारायण राणेंचा सवाल

खारघर-बेलापूर सागरी मार्ग रखडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 05:04 IST

आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्श्वभूमीवर सिडकोच्या माध्यमातून खारघर ते बेलापूर दरम्यान प्रस्तावित करण्यात आलेल्या सागरी मार्गाचे काम रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्श्वभूमीवर सिडकोच्या माध्यमातून खारघर ते बेलापूर दरम्यान प्रस्तावित करण्यात आलेल्या सागरी मार्गाचे काम रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या कामासाठी सिडकोने जे. कुमार इन्फ्रा या कंपनीची नियुक्ती केली आहे; परंतु या कंपनीबाबत न्यायालयीन वाद निर्माण झाल्याने तूर्तास या प्रकल्पाच्या कामाला खीळ बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम प्रगतिपथावर आहे. २०२० मध्ये या विमानतळावरून विमानाचे टॅकआॅफ होईल, असा विश्वास सिडकोला वाटतो आहे. त्या अनुषंगाने विमानतळाला पूरक अशा दळणवळणाच्या सुविधांवर सिडकोने भर दिला आहे. रस्ते वाहतुकीसह मेट्रो व सागरी मार्गाच्या निर्मितीवर विशेष भर दिला जात आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणारा सागरी मार्ग दोन टप्प्यात पूर्ण केला जाणार आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल) शिवडी ते नवी मुंबई विमानतळ हा या प्रकल्पाचा पहिला टप्पा आहे. तर खारघर, आम्रमार्ग आणि नेरुळ येथील जेट्टी असा ९.५ कि.मी. लांबीचा या मार्गाचा दुसरा टप्पा असणार आहे. २०२१ पर्यंत दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण करण्यात येणार असून, त्यासाठी २७० कोटी रुपये खर्च निर्धारित करण्यात आला आहे. या कामाचा ठेका जे. कुमार इन्फ्रा या कंपनीला देण्यात आला आहे; परंतु रस्त्याच्या कामातील अनियमितता आणि सुमार दर्जामुळे मुंबई महापालिकेने २०१६ मध्ये या कंपनीला सात वर्षांसाठी काळ्या यादीत टाकले होते. हाच धागा पकडून ललित अग्रवाल यांनी सिडकोच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर बुधवारी सुनावणी झाली. दोन्ही बाजूच्या युक्तिवादानंतर जे. कुमार इन्फ्रा या कंपनीला तूर्तास सागरी मार्गाच्या कामाची वर्कआॅर्डर न देण्याचे निर्देश न्यायालयाने सिडकोला दिले आहेत. या प्रकरणी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केल्याचे सिडकोचे मुख्य अभियंता एस. के. चौटालिया यांनी स्पष्ट केले आहे.>काम नियोजित वेळेतच पूर्णया प्रकरणामुळे निर्माण झालेला न्यायालयीन तिढा सुटण्यास किती काळ लागेल याचा नेम नसल्याने या मार्गाचे काम रखडण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त होत आहे; परंतु सिडकोच्या संबंधित विभागाने ही शक्यता फेटाळून लावली असून प्रस्तावित मार्गाचे काम नियोजित वेळेत पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्तकेला आहे.