शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

खांदेश्वरमधील गाळे धूळखात पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 04:06 IST

सिडकोचे दुर्लक्ष : सामाजिक कार्यासाठी वापराचीही परवानगी नाही

कळंबोली : सिडकोने खांदेश्वर मंदिर परिसरामध्ये दहा वर्षांपूर्वी आठ गाळे बांधले आहेत, परंतु अद्याप त्याचा वापर केला जात नाही. सामाजिक उपक्रमासाठी वापर करण्याचीही परवानगी दिली जात नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकपदी दीपक कपूर असताना त्यांनी २००८ मध्ये खांदेश्वर मंदिर परिसर आणि तलावाचे सुशोभीकरण केले. त्याचबरोबर बाजूला असलेल्या उद्यानाचा विकास केला.तिथे चिल्ड्रन पार्क, नर्सरी त्याचबरोबर इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या. त्याचवेळी उद्यानाच्या बाजूलाच एकूण आठ लहान गाळे बांधण्यात आले. त्यामध्ये विविध वस्तू तसेच खाद्यपदार्थ विक्र ी हा या पाठीमागचा उद्देश होता. मात्र दीपक कपूर आणि तत्कालीन कार्यकारी अभियंता संजय दाहेदार यांची बदली झाल्यानंतर या परिसराकडे दुर्लक्ष करण्यात आले. तसेच हे गाळ्यांचा सुध्दा वापर करण्यात आला नाही. आजच्या घडीला या गाळ्यांची अवस्था बिकट आहे. वरती गवत वाढले असून आतमध्ये जाळे जळमाटे झाले आहेत. शटर गंजले आहे, समोर दलदल असल्याने एक प्रकारे घसरगुंडी तयार झालेली आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाजूला स्वर्गीय दि.बा. पाटील व्यवसाय प्रशिक्षण केंद्र आहे. मात्र सिडकोकडून गेल्या दहा वर्षांत कोणताही कार्यवाही करण्यात आली नाही. अलर्ट सिटीझन फोरम, योगा मॉर्निंग ग्रुप आणि संजय भोपी सोशल क्लबच्या वतीने या ठिकाणी वाचनालय सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव दिला होता. त्यासाठी जागेची मागणी सुध्दा त्यांनी सिडकोकडे केली होती, तसेच वारंवार पाठपुरावा सुध्दा केला होता. मात्र सिडकोकडून याबाबत सकारात्मक भूमिका घेण्यात आली नाही. त्यामुळे दहा वर्षांपूर्वी करण्यात आलेला लाखो रुपयांचा खर्च पाण्यात गेला आहे. या संदर्भात अधीक्षक अभियंता पी.एस. फुलारी यांना विचारणा केली असता माहिती घेऊन सांगतो, असे म्हणाले, कार्यकारी अभियंता भगवान साळवी प्रतिक्रियेस उपलब्ध होऊ शकले नाहीत.खांदा वसाहतीतील माझे वाचनालय सुरू करण्याचा आमचा मानस आहे. विशेष म्हणजे आमच्याकडे हजारो पुस्तके जमा झालेली आहेत. मात्र सिडकोकडून खांदेश्वर मंदिर परिसरातील बंद गाळे उपलब्ध करून दिले जात नाही. या आडमुठ्या धोरणामुळे आजच्या घडीला हे गाळे धुळीचे बाहुले बनले आहे.- संजय भोपी, नगरसेवक, पनवेल महापालिका 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई