शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

केवाळे ब्रिज बनला धोकादायक, पर्यायी पुलाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 03:09 IST

पर्यायी पुलाची गरज : अरुंद पुलामुळे अपघाताची शक्यता

मयूर तांबडे

पनवेल : तालुक्यातील केवाळे जवळील अरुंद पुलामुळे नागरिकांना वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत आहे. तसेच या पुलाला खालील बाजूस असणारे स्टील गंजू लागले असल्याने हा पूल धोकादायक बनला असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे येथे दुसरा पूल बांधण्याची मागणी नागरिक करत आहेत.

पनवेल तालुक्यातील केवाळे गावाजवळ असलेल्या नदीवर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत वाकडी व केवाळे गावाला जोडण्यासाठी पूल बांधण्यात आलेला आहे. मात्र वाढत्या लोकसंख्येचा विचार न करता हा पूल बांधण्यात आला असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. पूल अरुंद असल्याने एका वेळी एकच चारचाकी गाडी जात आहे त्यामुळे इतर मोठ्या वाहनांना थांबावे लागत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. पुलाच्या खाली बाजूस असणाऱ्या लोखंडी सळ्या दिसू लागल्याने पुलावरून वाहतूक करणे धोकादायक झाले आहे. खालील बाजूचे सिमेंटचे प्लास्टर देखील गळू लागले आहे. त्यामुळे या पुलाची डागडुजीकरण करण्याची आवश्यकता आहे. वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी दुसरा पूल देखील आवश्यक आहे. या भागात केवाळे, वाकडी, चिंचवली, उसर्ली, दुंदरे, मोरबे यांच्यासह आदिवासी वाड्यांचे प्रमाण अधिक आहे. पनवेल परिसरात विमानतळ होत असल्याने या परिसराचा कायापालट होताना दिसत आहे. त्यामुळे मोठमोठ्या इमारती व नवनवीन प्रोजेक्ट या परिसरात येत आहेत. मात्र अरुंद पुलामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. पुलाखालील बांधकामाचे स्टील गंजू लागल्याने तो खचण्याची भीती नागरिकांना वाटत आहे.केवाळे येथील हा जुना पूल पाडून त्याजागी दुसरा मोठा व रु ंद नवीन पूल बांधण्यात येणार आहे. लवकरच त्या कामाला सुरु वात करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे देण्यात आली आहे.केवाळे येथील पुलाची अवस्था दयनीय झालेली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडण्यापूर्वी त्याची डागडुजी करण्यात यावी व दुसरा पूल बांधण्यात यावा. ङ्क्त- रमेश पाटील,उपसरपंच, दुंदरे ग्रामपंचायत

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईpanvelपनवेल