शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दगाफटका टाळण्यासाठी नगरसेवकांवर पाळत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 02:48 IST

कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये नगरसेवक फोडण्याची शक्यता गृहीत धरून, सर्वपक्षीयांनी काळजी घेण्यास सुरुवात केली आहे.

वैभव गायकर पनवेल : कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये नगरसेवक फोडण्याची शक्यता गृहीत धरून, सर्वपक्षीयांनी काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. शेतकरी कामगार पक्षाने त्यांचे नगरसेवक गोव्याला हलविले असून, भाजपाने खोपोलीमधील अ‍ॅडलॅब इमॅजिकामध्ये नगरसेवकांना पाठविले आहे.कर्नाटकामध्ये उद्भवलेल्या परिस्थितीची प्रचिती जणू स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत येत आहे. राज्यातील राजकारणात आपले वेगळे अस्तित्व निर्माण करणारे राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी आपल्या मुलाला अनिकेत तटकरेला या निवडणुकीत उतरविले आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. निवडणुकीत दगाफटका होऊ नये, म्हणून इतर स्थानिक स्वराज्य संस्थेतील प्रतिनिधींसह पनवेल शेकापचे नगरसेवक मागील दोन दिवसांपासून २९ पैकी जवळ जवळ २५ नगरसेवक गोव्यामध्ये आहेत. तर भाजपाचेही नगरसेवक शुक्र वारी खोपोली येथील अ‍ॅडलॅब इमॅजिका येथे रवाना झाले.भाजपाच्या ५४ नागरसेवकांपैकी ४४ नगरसेवक सध्या इमॅजिका या ठिकाणी आहेत. यापैकी निम्मे नगरसेवक कुटुंबासह या ठिकाणी तळ ठोकून आहेत. २१ तारखेला निवडणूक असल्याने पुढील तीन दिवस भाजपा नगरसेवक बाहेरच असणार आहेत. विधानपरिषद निवडणुकीत स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिकेत तटकरे यांना पाठिंबा जाहीर केला आहे, त्यामुळे अनिकेत तटकरे यांचे पारडे जड मानले जात आहे. माजी दिवंगत आमदार अशोक साबळे यांचे सुपुत्र अ‍ॅड. राजीव साबळे हे तटकरेंना अव्हान देत आहेत. सेना-भाजपाची या मतदार संघात अघोषित युती असली, तरी पालघरमधील लोकसभेच्या जागेसाठी सुरू असलेले शीतयुद्धाचे परिणाम या ठिकाणी उमटण्याची शक्यता आहे, त्यामुळे भाजपाची भूमिका निर्णायक असणार आहे.> पक्षीय बलाबलया निवडणुकीत एकूण ९४१ मतदार आहेत. ४४१ ही मॅजिक फिगर आहे. काँग्रेस राष्ट्रवादी, शेकाप, मनसेचे एकूण ३५० मतदान आहे. मात्र, राज ठाकरेंनी आमचा कोणालाच पाठिंबा नसल्याचे स्पष्ट केल्याने, मनसेची २५ मते कमी होण्याची शक्यता आहे. स्वाभिमानी पक्षाची ९६ मते निर्णायक असणार आहेत. यामध्ये फोडाफोडीचे राजकारण महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. केंद्रीय मंत्री अनंत गीते, माजी आमदार मधुकर ठाकूर हे तटकरेंचे राजकीय वैरी मानेल जातात, त्यामुळे यांची भूमिकादेखील महत्त्वाची असणार आहे.