शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
2
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
4
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
5
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
6
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
7
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
8
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
9
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
10
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
11
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
12
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
13
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
14
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
15
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
16
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
17
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
18
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
19
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
20
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!

कर्जत पं. स.च्या १२ गणांसाठी आरक्षण

By admin | Updated: November 17, 2016 05:46 IST

पंचायत समितीच्या नव्याने पुनर्रचना करण्यात आलेल्या गणांची सोडत १८ नोव्हेंबर रोजी होत आहे.

कर्जत : पंचायत समितीच्या नव्याने पुनर्रचना करण्यात आलेल्या गणांची सोडत १८ नोव्हेंबर रोजी होत आहे. २०१७ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षित जागांकरिता आरक्षण सोडत काढली जाणार आहे. २४ आॅक्टोबर रोजी काढण्यात आलेली आरक्षण सोडत गणांची संख्या वाढल्याने राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेने रद्द केली होती.मागील महिन्यात काढण्यात आलेली आरक्षण सोडत ही १० गणांसाठी काढण्यात आली होती. पनवेल महानगरपालिकेचा निर्णय झाल्यानंतर रायगड जिल्हा परिषदेची आणि जिल्ह्यातील काही तालुका पंचायत यांच्यात गणांमध्ये वाढ झाली होती. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने रायगड जिल्ह्यात झालेली जिल्हा परिषद प्रभाग आणि तालुका पंचायत समितीच्या २०१७ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १८ नोव्हेंबर रोजी आरक्षण सोडत काढली जाणार आहे. अनुसूचित जाती-जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि महिला राखीव गण निश्चित करण्यासाठी ही सोडत काढली जाणार आहे. कर्जत चार फाटा येथील कृषी संशोधन केंद्राच्या सभागृहात ही सोडत सकाळी ११ वाजता काढली जाणार असल्याची माहिती कर्जतचे तहसीलदार अविनाश कोष्टी यांनी दिली. कर्जत तालुक्यात १९९२ नंतर पुन्हा कर्जत पंचायत समितीच्या १२ गणांसाठी २०१७ मध्ये सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. जुने सर्व प्रभाग फोडून तयार झालेल्या कर्जत पंचायत समितीच्या १२ गणांची सोडत पूर्णपणे नवीन होणार की मागील १५ वर्षांतील निवडणुकीचा आधार घेऊन आरक्षण सोडत काढली जाणार? याबाबत कर्जत तालुक्यातील सर्व राजकारणी यांच्यात कुतूहल निर्माण झाले आहे. 18 नोव्हेंबर रोजी रायगड जिल्ह्यात झालेली जिल्हा परिषद प्रभाग आणि तालुका पंचायत समितीच्या २०१७ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडत काढली जाणार आहे. कर्जत चार फाटा येथील कृषी संशोधन केंद्राच्या सभागृहात ही सोडत सकाळी ११ वाजता काढली जाणार आहे.