शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

गृहराज्यमंत्र्यांनी केली कर्जत पोलीस वसाहतीची पाहणी

By admin | Updated: June 22, 2017 00:22 IST

राज्याचे गृहराजमंत्री दीपक केसरकर हे एका कार्यक्रमानिमित्त कर्जतमध्ये आले होते. त्या वेळी त्यांनी कर्जत शहरात असलेल्या पोलीस वसाहतीची पाहणी केली

लोकमत न्यूज नेटवर्ककर्जत : राज्याचे गृहराजमंत्री दीपक केसरकर हे एका कार्यक्रमानिमित्त कर्जतमध्ये आले होते. त्या वेळी त्यांनी कर्जत शहरात असलेल्या पोलीस वसाहतीची पाहणी केली. ज्या वसाहती दुरु स्त करता येतील, त्या दुरुस्त केल्या जातील. मात्र, पोलीस कर्मचाऱ्यांना मालकीची घरे देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करणार, असे त्यांनी सांगितले.कर्जत पोलीस ठाण्यात सुमारे ५५ पोलीस कर्मचारी आहेत, कर्जतमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांसाठी पाच वसाहती आहेत, त्यापैकी दोन वसाहती या कर्जतच्या टेकडीवर आहेत. मात्र, त्या सध्या वापरात नाहीत. तीन वसाहती या कर्जत पोलीस ठाण्याच्या आजूबाजूला आहेत. त्यापैकी दोन वसाहती या ब्रिटिशकालीन आहेत. पोलीस ठाण्याच्या मागील बाजूस असलेली वसाहत १८७१ साली बांधण्यात आली आहे. त्या वसाहतीमध्ये आठ खोल्या आहेत. तर पोस्ट आॅफिस जवळ असलेली पोलीस वसाहत ही १८८७ साली बांधण्यात आली आहे. त्या ठिकाणी आठ खोल्या असून, त्यापैकी तीन खोल्या वापरात आहेत. या वसाहतीत तीन खोल्यांमध्ये कर्मचारी राहतात. मात्र, वसाहतीच्या बाजूला महाकाय वृक्ष वाढला आहे. त्याच्या फांद्या वसाहतीवर आल्या आहेत. त्या वादळी वाऱ्यात कधीही वसाहतीवर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या वसाहती आहेत. मात्र, त्या अनेक सोयींनी वंचित आहेत.तिसरी वसाहत ही उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यालयाच्या मागे आहे. या इमारतीचे कामे १९८४मध्ये करण्यात आले आहे. या इमारतीमध्ये १३ खोल्या आहेत. मात्र, या इमारतीचे काम निकृष्ट दर्जाचे आहे की त्या इमारतीची अवस्था दयनीय आहे. कसेबसे पाच कर्मचारी या इमारतीमध्ये राहत आहेत. त्या ठिकाणी कसली सोय नसल्याने पोलीस कर्मचाऱ्याला भाड्याने खोली घेऊन राहावे लागत आहे. वसाहतीच्या दुरवस्थेमुळे पोलीस कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत. कर्जत येथे खासगी कार्यक्र मासाठी आलेल्या गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांना शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक नितीन सावंत यांनी पोलीस वसाहतीची माहिती दिली.गृहराज्यमंत्री केसकर यांनी पोलीस वसाहतीची पाहणी केली. या वेळी रायगडचे पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नागकुल, कर्जत पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे आदी उपस्थित होते.