शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

कर्जतमध्ये भाजपा स्वबळावर लढणार

By admin | Updated: January 11, 2017 06:18 IST

कर्जत तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेच्या सहा गट आणि कर्जत पंचायत समितीच्या १२ गणांसाठी होणाऱ्या आगामी निवडणुकीत भारतीय जनता पार्टी

नेरळ : कर्जत तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेच्या सहा गट आणि कर्जत पंचायत समितीच्या १२ गणांसाठी होणाऱ्या आगामी निवडणुकीत भारतीय जनता पार्टी स्वबळावर निवडणुकीला सामोरी जाणार आहे. पक्षाची वाढती ताकद आणि मतदारांना आजमावण्यासाठी भाजपा स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक स्वबळावर लढविणार आहे, असे मंगळवारी पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आले.कर्जत येथील शासकीय विश्रामगृहात भाजपाच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आपली भूमिका भाजपातालुका अध्यक्ष दीपक बेहेरे यांनी मांडली. त्यांनी सुरुवातीला शिवसेना आणि भाजपा हे महाराष्ट्रात युतीचे समीकरण जुळले आहे; परंतु कर्जत तालुक्यात आम्ही स्वबळावर लढून पक्षाची ताकद आजमावणार आहोत. त्यासाठी जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्याशी मंगळवारी सकाळी सविस्तर चर्चा झाल्यानंतर भाजपाची भूमिका स्वबळावर लढविण्याची असल्याचे तालुकाध्यक्ष बेहेरे यांनी स्पष्ट केले. भाजपाचे जिल्ह्यातील नेते नितीन कांदळगावकर यांनी कर्जत तालुक्यात समविचारी पक्षांना बरोबर घेण्याची परवानगी नेतृत्वाकडे मागितली आहे. त्यामुळे तालुक्यात काही भागात ताकद असलेल्या पक्षांबरोबर युती होऊ शकते. त्याच वेळी आमच्या पक्षासोबत अनेक वर्षे असलेल्या आरपीआय आठवले गटालाही त्यांची सोबत येण्याची तयारी असल्यास सामावून घेण्याची तयारी असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. शिवसेनेबरोबर आमची जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी कर्जत तालुक्यात युती नसेल, असे स्पष्ट झाले आहे. पनवेल येथील वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीला कर्जत तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या कोअर कमिटीचे सर्व सदस्य उपस्थित असल्याचे या वेळी स्पष्ट केले. भाजपाचे तालुकाध्यक्ष दीपक बेहेरे, जिल्हा चिटणीस रमेश मुंढे, मीडिया सेलचे जिल्हाध्यक्ष नितीन कांदळगावकर, किसान सेलचे राज्य चिटणीस सुनील गोगटे, जिल्हाध्यक्ष अशोक गायकर, तालुका सरचिटणीस राजेश भगत, अशोक ओसवाल आदी प्रमुख उपस्थित होते.