शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

कळंबोलीकरांचा जीव धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2019 00:04 IST

कळंबोली वसाहतीतील जवळपास सात हजार घरे मोडकळीस आली आहेत.

कळंबोली : कळंबोली वसाहतीतील जवळपास सात हजार घरे मोडकळीस आली आहेत. येथील पुनर्वसनाचा प्रश्न गंभीर असून सिडको व महापालिकेकडून कोणत्याही हालचाली होताना दिसत नाहीत, तर केवळ एकमेकांकडे बोट दाखविण्यात येत आहेत. त्यामुळे डोंगरी येथील इमारत दुर्घटनेची पुनरावृत्ती कळंबोलीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.सिडकोने कळंबोली वसाहत विकसित करताना अल्प उत्पन्न गटातील लोकांकरिता १८ हजार घरे बांधली. या ठिकाणी सिडकोकडून काही वर्षे सुविधा पुरवण्यात आल्या. मात्र, गेल्या दहा वर्षांत पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने स्लॅब कोसळणे, भिंतीला तडे जाणे, पावसाळ्यात गळती लागणे, प्लॅस्टर निघणे असे प्रकार वारंवार घडत आहेत. सिडकोकडून घरांची किरकोळ दुरुस्तीही करण्यात न आल्याने इमारती मोडकळीस आल्या आहेत. वारंवार पुनर्विकासासाठी पाठपुरावा करूनही सिडकोकडून लक्ष दिले जात नसल्याचे आत्माराम कदम या रहिवाशाचे म्हणणे आहे. महापालिका अस्तित्वात आल्यानंतर सिडकोने आपली जबाबदारी झटकण्यास सुरुवात केली. मोडकळीस आलेल्या घरांची जबाबदारी महापालिकेची आहे, असे सिडकोकडून सांगण्यात येते तर महापालिका सिडकोकडे बोट दाखवते. त्यामुळे या इमारतीमधील रहिवाशांना वाली कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.मोडकळीस आलेली घरे जमीनदोस्त करून त्या जागी नवीन इमारती बांधण्यासाठी आतापर्यंत शासनाने चार वेळा जीआर काढला; पण आजपर्यंत ठोस भूमिका घेतली गेली नाही. सिडकोकडून दोन वर्षांपासून धोकादायक इमारतींना नोटिसा देणे बंद केले आहे. यंदा महापालिकेकडून फक्त सात इमारतींना नोटिसा देण्यात आल्या आहेत. डोंगरी येथील इमारत पत्त्यासारखी कोसळली. या दुर्घटनेत अनेकांचे प्राण गेले. कळंबोलीतही गेल्या दहा वर्षांपासून धोकादायक इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आहे.>कळंबोली वसाहतीत सेक्टर १, १ई मधील एफ टाइप, के एल ६, सेक्टर ३ ई मध्ये एफ टाइप, केएल ५, केएल ६, ई टाइप, सेक्टर ४ ई येथील एफ टाइप, केएल ४, एफ टाइप, त्याचबरोबर सेक्टर ५ मधील केएल २, तर सेक्टर ६ मधील केएल १ या परिसरातील जवळपास सात हजार घरे मोडकळीस आली आहेत.>कळंबोली वसाहतीतील धोकादायक इमारतींना नोटिसा देण्यात आल्या आहेत. तशा रहिवाशांना सूचनाही करण्यात आल्या आहेत. पुनर्विकासासाठी सिडकोने दखल घेतली पाहिजे, ती त्यांची जबाबदारी आहे.- जमीर लेंगरेकर,उपायुक्त,पनवेल महापालिका