शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

कळंबोली-उरण एनएमएमटी ठरतेय डोकेदुखी

By admin | Updated: June 18, 2017 02:05 IST

कळंबोलीवरून उरणकडे जाणाऱ्या एनएमएमटी बसची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे सध्या ही बससेवा प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे. अनेक तक्रारी करूनदेखील

लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : कळंबोलीवरून उरणकडे जाणाऱ्या एनएमएमटी बसची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे सध्या ही बससेवा प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे. अनेक तक्रारी करूनदेखील एनएमएमटी प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. कळंबोली ते महामार्गावर ३० क्रमांकाची एनएमएमटी बस धावते. खारघर मार्गे, सीबीडी बेलापूर त्यानंतर उलवा नोडमधून ही बस उरणकडे प्रस्थान करते. या मार्गावर एमएमएमटीच्या जुन्या व तकलादू बस चालविल्या जात असल्याची तक्रार खारघरमधील रहिवासी पांडुरंग शिरसकर यांनी लेखी पत्राद्वारे महापालिका आयुक्तांकडे केली आहे. दर ३० मिनिटांना या मार्गावर ही बस धावते. मात्र, मोडकळीस आलेल्या बसमुळे ती अनेकदा नादुरुस्त होते. त्यामुळे प्रवाशांना कधीच वेळेवर कामावर पोहोचता येत नाही.बस स्थिती आणि सेवा सुधारण्याची गरजकळंबोली ते उरण दरम्यान बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे एनएमएमटी प्रशासनाकडून अत्याधुनिक सेवा देण्याची गरज आहे. मात्र, त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. बसमध्ये अत्याधुनिक यंत्रणा बसविण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करणाऱ्या पालिका प्रशासनाने बसची स्थिती आणि सेवा सुधारण्याची गरज असल्याचे शिरसकर यांनी स्पष्ट केले.