शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कळंबोली सर्कल खड्ड्यांत

By admin | Updated: July 30, 2015 23:53 IST

अवजड वाहनांची वाहतूक वाढल्याने कळंबोली सर्कल परिसरातील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. हे खड्डे चुकवताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असून त्यामुळे

कळंबोली : अवजड वाहनांची वाहतूक वाढल्याने कळंबोली सर्कल परिसरातील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. हे खड्डे चुकवताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असून त्यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. कळंबोली सर्कलला पनवेल-सायन, एनएच -४ , एनएच-४बी हे महामार्ग जोडले जातात. याच ठिकाणी स्टील मार्केट असल्याने रात्रंदिवस वाहनांची वर्दळ सुरू असते. जेएनपीटीकडे जाणारी मालवाहू वाहनेही कळंबोली सर्कलवरूनच जातात. सततच्या अवजड वाहतुकीमुळे परिसरातील रस्ते खराब झाले असून ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. पनवेल-सायन महामार्गावर कळंबोली वाहतूक शाखेसमोर मोठे खड्डे पडले आहेत. पावसाचे पाणी त्यात साचत असल्याने वाहनचालकांना अंदाज येत नाही, परिणामी अपघात होत आहेत. दोन दिवसांपूर्वी खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात एक स्कुटी घसरली, सुदैवाने यावेळी कुणी जखमी झाले नाही. नवीन रस्ता तयार करताना पाण्याचा निचरा करण्यासाठी योग्य उपाययोजना न झाल्याने अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचते. मुंब्य्राकडे जाणाऱ्या मार्गावरही मोठमोठे खड्डे पडले आहेत. कळंबोली सर्कलला जोडणाऱ्या वेगवेगळ्या रस्त्याची मालकी सार्वजनिक बांधकाम, रस्ते विकास महामंडळ, सिडको आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे आहे. त्यांच्यात समन्वय नसल्याने रस्त्याच्या दुरुस्तीस विलंब होत असल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे. कळंबोली सर्कल ते डी पॉइन्ट या दरम्यानच्या रस्त्याची अतिशय वाईट स्थिती निर्माण झाली आहे. नौपाडा गावाजवळ तर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागतेच, त्याचबरोबर वाहनांचे नुकसान होत असल्याचे बाळासाहेब जाधव या कंटेनर चालकाने सांगितले. (वार्ताहर)