शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

कळंबोली सर्कलला मिलिंग मशिन

By admin | Updated: June 16, 2017 02:28 IST

स्टील मार्केटमुळे कळंबोली सर्कल परिसरातील रस्ते वारंवर खड्डेमय होतात. त्यामुळे वाहन चालविणे जिकिरीचे होऊन अपघातांचे प्रमाण वाढते. पावसाळ्यात खोलीचा

लोकमत न्यूज नेटवर्ककळंबोली : स्टील मार्केटमुळे कळंबोली सर्कल परिसरातील रस्ते वारंवर खड्डेमय होतात. त्यामुळे वाहन चालविणे जिकिरीचे होऊन अपघातांचे प्रमाण वाढते. पावसाळ्यात खोलीचा अंदाज न आल्याने अनेकदा वाहने उसळतात. यावर उपाय म्हणून आयआरबीने या ठिकाणचे खड्डे बुजवण्याकरिता मिलिंग मशिनचा आधार घेतला आहे. संगणकीय प्रणालीवर चालणाऱ्या या मशिनव्दारे खड्डे बुजविण्यात येत असून त्याचा दर्जा चांगला असल्याने रस्ता लवकर खराब होत नसल्याचा दावा आयआरबीकडून करण्यात आला आहे.कळंबोली सर्कलवरून द्रुतगती तसेच मुंबई-गोवा महामार्ग, जेएनपीटी, मुंब्रा-कल्याण मार्ग जोडले गेले आहेत. एकंदरीतच जंक्शन असल्याने वाहनांची वर्दळ सुरू असते. विशेष करून बाजूला लोह-पोलाद मार्केट असल्याने मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची गर्दी असते. जेएनपीटीलाही कळंबोली सर्कलवरूनच जावे लागते. त्यामुळे मालवाहतूक करणाऱ्या वाहनांची येथे जास्त वर्दळ असते. त्यामुळे सर्कललगतचे रस्ते खराब होतात, मोठमोठे खड्डे पडतात. महामार्गावर कळंबोली वाहतूक शाखेसमोर मोठे खड्डे पडले होते. दरवर्षी पावसाळ्यात पावसाचे पाणी त्यामध्ये साचते त्यामुळे वाहनचालकांना काहीच अंदाज येत नाही. त्यामुळे खड्ड्यात वाहन आदळून अपघात होत असल्याचे वाहतूक पोलिसांचे निरीक्षण आहे. पाण्याचा निचरा करण्याकरिता चांगली उपाययोजना न झाल्याने कळंबोली सर्कलला खड्डे पडतात. मुंब्रा महामार्गावर कळंबोली सर्कललगत मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. यासंदर्भात कळंबोली वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरख पाटील यांनी वारंवार पाठपुरावा केला. तर वाहतूक विभागाने खड्ड्यांबाबत संबंधित विभागाला पत्रही देण्यात आले होते. त्यानुसार पावसाच्या अगोदर आयआरबीने आपल्या हद्दीतील रस्त्यांचे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून काम हाती घेतले आहे. मशिनचे वैशिष्ट्य पूर्ण संगणकीय प्रणालीचा वापर या मशिनमध्ये गेला आहे. त्या माध्यमातून एक फूट खोलपर्यंत काँक्रीट, डांबर, खडी उकरता येते. त्यानंतर त्या खड्ड्याची तंतोतंत लेवल करून कॉम्प्रेशरने साफसफाई करण्यात येते. त्यानंतर डांबर भरून रस्ता पक्का केला जातो.एका तासात ही मशिन सातशे मीटर काम करते.अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून १३0 एच.पी.ची ही मशिन तयार केली आहे. संगणकाव्दारे ही मशिन आॅपरेट केली जाते. आतापर्यंत आम्ही दहा हजार खड्डे या मशिनव्दारे बुजवले आहेत. सात तास ही मशिन चालवली जाते, कामाचा उरक होतोच त्याचबरोबर दर्जा राखला जातो.- उमेश कोल्हाळ, सुपरवायझर, आयआरबी