शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कबड्डीपटू अभिलाषा म्हात्रे यांचा मनपाकडून सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 07:05 IST

आशियाई अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत भारतीय महिला संघाने सुवर्णपदक पटकाविल्याबद्दल भारतीय महिला कबड्डी संघाच्या कर्णधार व महापालिकेच्या क्रीडा अधिकारी अभिलाषा म्हात्रे यांचा आज महापालिका मुख्यालयात सन्मान करण्यात आला.

नवी मुंबई : आशियाई अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत भारतीय महिला संघाने सुवर्णपदक पटकाविल्याबद्दल भारतीय महिला कबड्डी संघाच्या कर्णधार व महापालिकेच्या क्रीडा अधिकारी अभिलाषा म्हात्रे यांचा आज महापालिका मुख्यालयात सन्मान करण्यात आला. यावेळी महापौर, आयुक्त यांच्या पालिकेचे पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.नुकत्याच गोरगान इराण येथे दि. २३ ते २६ नोव्हेंबरदरम्यान पार पडलेल्या आशियाई अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत भारताच्या पुरुष आणि महिला संघांनी अंतिम विजेतेपद संपादन करून देशाचा बहुमान वाढविला आहे. त्यातही महिलांच्या क बड्डी संघाच्या कर्णधार अभिलाषा म्हात्रे या महापालिकेच्या क्रीडा अधिकारी असल्याने हे यश नवी मुंबईकरांसाठी आनंदाची व अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळे भारतीय संघ मायदेशी परतल्यावर आज महापालिका मुख्यालयात महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते महापौर दालनात सत्कार करण्यात आला. यावेळी उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे, स्थायी समिती सभापती शुभांगी पाटील, क्रीडा व सांस्कृतिक समितीचे सभापती विशाल डोळस, समाज कल्याण व झोपडपट्टी सुधार समितीच्या सभापती अनिता मानवतकर, माजी महापौर सागर नाईक, उपायुक्त अंकुश चव्हाण, शिक्षणाधिकारी संदीप संगवे, माजी नगरसेवक संदीप सुतार आदि मान्यवर उपस्थित होते.यावेळी महापौर जयवंत सुतार म्हणाले, अभिलाषा म्हात्रे या महिला कबड्डीतील आयकॉन असून नवी मुंबई शहराचे भूषण आहेत. त्या भविष्यात अशी अनेक शिखरे पार करतील, त्यासाठी शहरवासीयांच्या शुभेच्छा पाठीशी आहेत. तसेच पालिकेच्या येत्या सर्वसाधारण सभेत त्यांचा सभागृहात यथोचित सन्मान करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.यावेळी पालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनीही अभिलाषा म्हात्रे यांना सत्कार करत उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक केले. ते म्हणाले, जेव्हा पालिकेचे अधिकारी आंतरराष्टÑीय पातळीवर अशी कामगिरी करतात त्यावेळी आपोआपच शहराचा व महापालिकेचा गौरव होतो. तसेचही कामगिरी नव्या पिढीसाठी आदर्शवत असल्याचे मत त्यांनी बोलून दाखविले.यावेळी सत्कारमूर्ती अभिलाषा म्हात्रे यांनी नवी मुंबईकरांचे प्रेम व पालिकेकडून खेळासाठी मिळणारे प्रोत्साहन याचा माझ्या यशात मोठा वाटा आहे. मी यापुढील काळात आपल्या सदिच्छांच्या बळावर खेळाचा आणखी दर्जा उंचावण्याकडे अधिक लक्ष देईन, अशा भावना व्यक्त केल्या.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई