शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

जॅकवेलमध्ये पडलेल्या मोरला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2016 01:33 IST

तालुक्यातील माझेरी येथील एका जॅकवेलमध्ये पडलेल्या मोराला सुखरूप बाहेर काढून वनरक्षकाकडे सुपुर्द केल्यानंतर महाड एमआयडीसीतील सफर या वन्य पशुपक्षी शुश्रूषा केंद्रात शनिवारी सायंकाळी दाखल करण्यात आले

बिरवाडी : तालुक्यातील माझेरी येथील एका जॅकवेलमध्ये पडलेल्या मोराला सुखरूप बाहेर काढून वनरक्षकाकडे सुपुर्द केल्यानंतर महाड एमआयडीसीतील सफर या वन्य पशुपक्षी शुश्रूषा केंद्रात शनिवारी सायंकाळी दाखल करण्यात आले. सफर केंद्रातील सर्पमित्र गणराज जैन, डॉ. सोनावणे, डॉ. अर्चना जैन यांनी त्या जखमी मोरावर उपचार सुरू केले आहेत. माझेरी येथील पारमाची वाडीवरील जॅकवेलमध्ये मोर पडल्याचे ग्रामस्थ बा. ल. सकपाळ यांनी पाहिले. त्यांनी याबाबत बिरवाडी वनरक्षक सुनील घोलप यांना कळविले. घोलप यांनी माझेरीजवळील तपासणी नाक्यातील वनरक्षक अंगद भोसले यास घटनास्थळी जाण्यास सांगितले. तोपर्यंत अशोक निकम, चंद्रकांत पवार व १५ ते २० ग्रामस्थांनी त्या मोराला काळजीपूर्वक काढून वनरक्षक भोसले यांच्या ताब्यात दिले. जॅकवेलमध्ये पडलेला मोर तीन ठिकाणी जखमी होता. मानेच्या खाली बाहेरील बाजूने अन्ननलिकेच्या मार्गापर्यंत मोठी जखम होती. मोराला घेऊन ताबडतोब वनरक्षक भोसले व ग्रामस्थ सतीश पवार यांनी सफर केंद्र गाठले. महाड येथील पशुवैद्यकीय अधिकारी नसल्याने वन खात्याच्या रोहा येथील उपविभागीय वनाधिकारी दीपक सावंत यांच्या परवानगीने व प्रांताधिकारी सुषमा सातपुते यांना कल्पना देऊन जखमी मोरावर डॉ. सोनावणे व डॉ. अर्चना जैन यांनी उपचार करण्यास सुरुवात केली. मोराच्या गळ्याची जखम आठ टाके घालून बंद करण्यात डॉ. अर्चना जैन व डॉ. सोनावणे यांना यश आले. (वार्ताहर)