शहरं
Join us  
Trending Stories
1
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
2
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
3
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
4
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
5
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
6
सात वर्षांनीही सापडला नाही मृतदेह; किर्ती व्यास हत्या प्रकरणात सहकारीच निघाले आरोपी
7
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
8
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
9
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
10
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
11
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
12
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
13
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
14
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
15
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
16
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 
17
या देशात सोडण्यात आले लॅबमध्ये विकसित केलेले लाखो डास, समोर आलं असं कारणं
18
प्रेम, शारीरिक शोषण, लग्न अन् तरूणाने काढला पळ; प्रेयसीने भररस्त्यात पकडून दिला चोप
19
शेअर बाजारात मोठी अस्थिरता, ४ जूनला भाजप सरकार आलं नाही तर काय असेल स्थिती?
20
राहुल गांधींच्या सभेमध्ये मंच कोसळला, नेतेमंडळींचा एकच गोंधळ उडाला

जेएनपीटी परिसर ठरतोय तस्करीचे केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 11:34 PM

दिल्ली पोलिसांनी पकडले हेरॉइन : रक्तचंदनासह सोने तस्करीच्या प्रकारात वाढ; सुरक्षा व्यवस्था वाढविण्याची गरज

नामदेव मोरे नवी मुंबई : पोलीस आयुक्तालय क्षेत्रामध्ये विशेषत: जेएनपीटीजवळचा परिसर तस्करीचे केंद्रस्थान ठरू लागला आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने तब्बल १३० किलो हेरॉइन या परिसरातून जप्त केल्यामुळे खळबळ उडाली आहे. यापूर्वीही परिसरात रक्तचंदन व सोने तस्करीचे प्रकार निदर्शनास आले असून सुरक्षा व्यवस्था कडक करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रामध्येही अमली पदार्थांची तस्करी वाढू लागली आहे. महाविद्यालयीन तरुणही अमली पदार्थांच्या आहारी जाऊ लागले आहेत. शहरातील उद्याने, मोकळ्या इमारतीमध्ये नशा करत असलेले तरुण बसलेले दृश्य दिसू लागले आहे. आयुक्तालय क्षेत्रामध्ये आतापर्यंत मोठ्या प्रमाणात गांजाची विक्री होत असल्याचे पोलिसांनी केलेल्या कारवाईवरून पाहावयास मिळत होते; परंतु आता एमडी पावडर, कोकेन, हेरॉइन या अमली पदार्थांचा वापर होऊ लागला आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने या परिसरातून तब्बल १३० किलो अफगाण हेरॉइन जप्त केले असून, बाजारभावाप्रमाणे त्याची किंमत जवळपास १३०० कोटी असल्याचे बोलले जात आहे. या कारवाईमुळे या परिसरातील तस्करीचे रॅकेट किती मोठ्या प्रमाणात आहे हे उघड झाले आहे. आतापर्यंत जेएनपीटीच्या परिसरामध्ये रक्तचंदन व सोने तस्करी मोठ्या प्रमाणात होऊ लागली होती. रक्तचंदनाचा मोठा साठा या परिसरातून नवी मुंबई पोलीस व सीमाशुल्क विभागानेही हस्तगत केला आहे. अनेक टोळ्या जेरबंद केल्या आहेत. एका वर्षामध्ये सोने तस्करीच्या अनेक घटना उघडकीस आल्या असून, आरोपींना अटक करण्यात आली आहे. सोने तस्करीचे प्रकार सीमाशुल्क विभागाने व इतर तपास यंत्रणांनी उघडकीस आणले आहेत.

जेएनपीटी हे देशातील प्रमुख बंदरापैकी एक आहे. यामुळे समुद्रमार्गे तस्करीसाठी या परिसराचा वापर होत आहे. मसाल्याचे पदार्थ, भंगार व इतर वस्तूंच्या आडून अवैध व्यापार होत आहे. तस्करी रोखण्यासाठी सीमाशुल्क विभागासह इतर तपास यंत्रणा असल्या तरी नवी मुंबई पोलिसांची जबाबदारीही वाढू लागली आहे. अमली पदार्थमुक्त नवी मुंबई करण्यासाठी पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी पथक तयार केले आहे; परंतु नवी मुंबई, पनवेल व उरण परिसरासाठी एकच पथक आहे. त्यामध्ये एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक, दोन सहायक पोलीस निरीक्षक व १२ कर्मचारी एवढेच मनुष्यबळ उपलब्ध आहे. आयुक्तालय क्षेत्रामध्ये होणाऱ्या कारवाईचे स्वरूप लक्षात घेता मनुष्यबळ खूपच कमी आहे. स्थानिक पोलीस स्टेशनकडून अपेक्षित कारवाई होत नाही, यामुळे उरण व पनवेलमध्येही अमली पदार्थ विरोधी स्वतंत्र पथक निर्माण करण्याची आवश्यकता आहे. गुन्हे शाखेसह स्थानिक पोलीस स्टेशनकडूनही अमली पदार्थांचे सेवन व अवैध व्यापार करणाऱ्यांवर नियमित कारवाई करण्याची आवश्यकता असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.

आयुक्तालय परिसरात प्रमुख तस्करीच्या घटना२०११ - जेएनपीटीजवळ सीमाशुल्क विभागाच्या पथकाने धाड टाकून दोन कोटी नऊ लाख रुपयांचे रक्तचंदन जप्त केले.आॅगस्ट २०१३ - उरण रोडवर दोन कंटेनरवर छापा टाकून साडेआठ कोटी रुपये किमतीचे ४२ टन रक्तचंदन जप्त केले.मार्च २०१५ - मुंबई-गोवा महामार्गावर कल्ले गावाजवळ कंटेनरमध्ये ४१ लाख ६० हजार रुपये किमतीचे रक्तचंदन जप्तडिसेंबर २०१७ - एसीच्या पार्टमधून ५० किलो सोन्यानी बिस्किटे लपवून आणली होती. सीमाशुल्क विभागाने सोने जप्त केले.मार्च २०१८ - दुबईला पाठविण्यासाठी आणलेले सात टन रक्तचंदन जप्त करण्यात आले.एप्रिल २०१९ - दुबईवरून आलेल्या भंगारामधून १९ किलो वजनाची सोन्याची बिस्किटे जप्त करण्यात आली.