शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

जे.एम. बक्क्षी पोर्टमध्ये मराठी भुमीपुत्रांना डावलून गुजराती कामगारांची भरती: प्रकल्पग्रस्तांमध्ये संतापाची लाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2023 20:16 IST

क्रेन दुरुस्ती विभागात प्रकल्पग्रस्तांना व स्थानिकांना डावलून आता पर्यंत २५  गुजराती कामगार भरले आहेत.

मधुकर ठाकूर/ उरण : येथील जेएनपीए अंतर्गत खासगीकरणातून सुरू करण्यात आलेल्या जे. एम. बक्क्षी पोर्टमध्ये स्थानिक भुमीपुत्रांना डावलून गुजराती कामगारांचा भरणा करण्यात येत असल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

काही महिन्यांपूर्वीच  जवाहरलाल नेहरू बंदरातील कंटेनर टर्मिनलचे खाजगीकरण झाले आहे. देशातील  सरकारी टर्मिनल जेएनपीएने पीपीपी तत्वावर ३० वर्षांच्या करारावर जे. एम. बक्क्षी कंपनीला दिले आहे.बंदर कंपनीकडे हस्तांतरही करण्यात आले आहे. व्यवसाय सुरू केल्यानंतर आतापर्यंत ८० हजार कंटेनरची हाताळणी केली.या खासगी बंदरात कामगार भरतीमध्ये आधी स्थानिक प्रकल्पग्रस्त कामगारांना प्राधान्य देण्याची अट बंदराचे खासगीकरण करण्याचा करार करताना घातली आहे. मात्र बंदरात स्थानिक मराठी भुमीपुत्रांना डावलून गुजराती कामगार मोठ्या प्रमाणावर कामगार भरण्यात आले आहेत. 

क्रेन दुरुस्ती विभागात प्रकल्पग्रस्तांना व स्थानिकांना डावलून आता पर्यंत २५  गुजराती कामगार भरले आहेत. याबाबत कामगार नेते व माजी विश्वस्त भूषण पाटील यांनी आवाज उठविला आहे. अनुभवी व शिक्षित प्रकल्पग्रस्त व स्थानिक कामगार उपलब्ध असून देखील त्यांना डावलण्यात आले आहे. सदर गुजराती कामगार कोणाच्या शिफारशीनुसार भरले याची चौकशी व्हावी व त्यांना ताबडतोब काढून त्यांचे जागेवर प्रकल्पग्रस्तांना व स्थानिकांना नोकर्‍या देण्यात याव्यात अशी मागणी भूषण पाटील यांनी केली आहे.

याप्रकरणी त्वरित जेएनपीटी प्रशासनाने त्यांचे सोबत बैठक बोलावून कारवाई करावी व तसे केल्यास जेएनपीटी प्रशासन भवना समोर आंदोलन करण्याची घोषणा त्यांनी केली आहे. त्यांचेवर जेएनपीए प्रशासनाचे नियंत्रण नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. जेएनपीटी प्रशासनाने त्यांना दिलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या व स्थानिकांच्या नावाच्या याद्या त्यांनी केराच्या टोपलीत टाकल्या असल्याचा गंभीर आरोपही भूषण पाटील यांनी केला आहे. या पूर्वी दुबई पोर्टच्या IGT टर्मिनलमध्ये अश्याच प्रकारे प्रकल्पग्रस्तांना व स्थानिकांना डावलून गुजराती व तामिळ कामगार भरले आहेत.स्थानिक भुमीपुत्रांना डावलून गुजराती कामगारांचा भरणा करण्यात येत असल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई